Headlines

भारतासाठी करो या मरोचा सामना; पण पावसामुळे प्लॅन बिघडणार? ब्रिस्टलच्या हवामानाचा अंदाज काय सांगतो?


IND Vs ENG 4th T20 Match Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंडमधील चौथ्या टी-20पूर्वी ब्रिस्टलच्या हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आज पावसाची शक्यता किती आहे? दरम्यान, हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

ind vs eng 4th t20 weather report bristol rain forecast
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत-इंग्लंड टी-20 मालिकेतील चौथा सामना आज ब्रिस्टलमध्ये होणार आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. पराभव झाल्यास मालिकेतील भारताचं आव्हान संपुष्टात येईल. मात्र भारतीय चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आजच्या सामन्यात पावसाचा फारसा अडथळा येण्याची शक्यता नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामना सुरू होईल तेव्हा ब्रिस्टलमध्ये पाऊस पडण्याची शक्यता जवळपास नाही. तापमान 32 अंश सेल्सिअस राहील, तर वाऱ्याचा वेगही कमी असेल. त्यामुळे पूर्ण सामना होण्याची शक्यता जास्त आहे.

पावसाची शक्यता फक्त 5 टक्के

दुसऱ्या डावातही पावसाची शक्यता केवळ 5 टक्के आहे. तापमान 28 अंशांपर्यंत खाली येऊ शकतं. त्यामुळे हवामानामुळे सामन्यावर मोठा काही परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही. दरम्यान, ब्रिस्टलच्या स्थानिक वेळेनुसार सामना सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. त्याआधी रात्री 9.30 वाजता नाणेफेक होईल. हा सामना ब्रिस्टलच्या काउंटी ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारताने यापूर्वी एकच टी-20 सामना खेळला असून, 2018 मध्ये इंग्लंडचा 7 विकेट्सनी पराभव केला होता.

Maharashtra TimesPM Narendra Modi : क्रिकेटच्या उदाहरणाने मोदींनी जिंकली मैफल, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरही उमटलं हास्य, नेमकं काय म्हणाले?

ब्रिस्टलमधील मैदानाचा इतिहास

ब्रिस्टलमध्ये आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने झाले आहेत. त्यापैकी 4 सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी, तर 3 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.

भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, तिलक वर्मा, रवी बिश्नोई, सूर्यांश शेडगे, हर्षित राणा, प्रिन्स यादव.

इंग्लंड संघ

लियाम डॉसन, आदिल रशीद, जोस बटलर (यष्टीरक्षक), जोफ्रा आर्चर, ल्यूक वूड, साकिब महमूद, सॅम करन, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोश टंग, हॅरी ब्रूक (कर्णधार), टॉम बँटन, विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स (यष्टीरक्षक), जेम्स कोल्स, जेकब बेथेल, रेहान अहमद, सोनी बेकर.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा