Headlines

Erling Haaland : विश्व फुटबॉलचा नवीन हिरो, नॉर्वेचं ‘गोल मशीन’, एर्लिंग हालँड नेमका कोण? पोरानं बापाचं नाव काढलं, संपूर्ण प्रवास जाणून घ्या – fifa world cup 2026 norway goal machine who is erling haaland


Erling Haaland News : वडिलांच्या गुडघ्यावर लाथ मारल्याने त्यांना निवृत्त व्हावं लागलं, वर्ल्ड कपचं राहिलेलं अधुर स्वप्न आता आपल्या खांद्यावर घेत एर्लिंग हालँडने आपली छाप पाडली आहे. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये संघाला क्वालिफाय करण्यापासून ते पाचवेळा वर्ल्डकप विजेत्या ब्राझील संघाला बाहेर करण्यात पठ्ठ्याचा मोलाचा वाटा, या हिरोच्या वडिलांच्या गुडघ्यावर कोणी लाथ मारलेली त्यानंतर त्याचा संपूर्ण प्रवास कसा होता जाणून घ्या.

Erling Haaland
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : फिफा वर्ल्डकप २०२६चा थरार सुरू असून दोन दिग्गज खेळाडूंचे संघ बाहेर पडले आहेत. ब्राझीलच्या पराभवानंतर मैदानातच नेमार ज्युनियरने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. तर पोर्तुगालच्या पराभवाने क्रिस्तियानो रोनाल्डोचाही प्रवास इथेच संपला. कारण त्याचा हा शेवटचा वर्ल्ड कप होता. आता सर्वात जास्त चर्चा नॉर्वेच्या एर्लिंग हालँड याची होत आहे. पठ्ठ्याने केलेल्या दोन गोलमुळे नॉर्वे संघाने इतिहासात पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली. उंची ६ फूट ५ इंच, मजबूत बांधा आणि चित्त्यासारखा चपळ असलेल्या नॉर्वेला ‘गोल मशिन’ म्हणून एर्लिंग हालँड ओळखला जातोय. पण तुम्हाला माहिती का एर्लिंग हालँड आपल्या २५ वर्षांनी आपल्या वडिलांच्याच जागी परतलाय. ज्या मैदानावर वडिलांचं स्वप्न तुटलं त्याच ठिकाणी हालँड आज धुमाकूळ घालतोय. वडिलांसोबत नेमकं काय घडलं होतं? ज्यामुळे त्यांना फुटबॉल खेळ सोडावा लागला. एर्लिंग हालँडचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घ्या.

एर्लिंग हालँडच्या वडिलांसोबत भर मैदानात बदला

१९९७मध्ये लीड्स युनायटेड आणि मँचेस्टर सिटीमधील सामन्यात लीड्सच्या अल्फ-इंगे (एर्लिंग हालँडचे वडील) यांच्या टॅकलमुळे मँचेस्टरचे रॉय मॉरिस कीन जखमी झाले होते. त्यावेळी रॉय कीन जवळपास एक वर्षभर दुखापतीमुळे फुटबॉलपासून लांब राहिले होते. पण त्यांच्या मनात सल राहिलीच होती, त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे २००१मध्ये पुन्हा दोन्ही संघ आमनेसामने आले. रॉय कीन यांनी अल्फ-इंगेंच्या गुडघ्यावर जोरात लाथ मारली, यामुळे हालँड यांना पुढे फुटबॉल कधीच खेळता आलं नाही शेवटी निवृत्ती घ्यावी लागली. याबाबत आपल्या बायोग्राफीमध्ये रॉय मॉरिस कीन यांनी स्पष्ट केलं की तो जाणूनबुजून मारलं आणि माझा बदला घेतला होता. Maharashtra TimesCristiano Ronaldo : वर्ल्डकपमधून पोर्तुगाल बाहेर, रोनाल्डोचं स्वप्न अधुरं, शेवटच्या 1 मिनिटात गेम पालटला

एर्लिंग हालँडचा संपूर्ण प्रवास

एर्लिंग हालँड याचा जन्म २१ जुलै २००१ मध्ये इंग्लंडमधील लीड्स येथे झाला होता. वडील अल्फ-इंगे हालँड व्यावसायिक फुटबॉलपटू आणि आई ग्राय मारिता ब्रॉट हेप्टाथलॉन चॅम्पियन होत्या. दुखापतीमुळे वडिलांना वयाच्या ३०व्या वर्षी निवृत्ती घ्यावी लागली, त्यानंतर अल्फ-इंगे हालँड आपल्या कुटुंबासह नॉर्वेला स्थायिक झाले. एर्लिंग हालँडने वयाच्या पाचव्या वर्षी ‘ब्राइन एफके’ अकादमीमधून आपल्या फुटबॉल प्रवासाला सुरुवात केली आणि नंतर याच क्लबमधून त्याची व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली.
Maharashtra TimesNeymar Retirement : ब्राझील वर्ल्ड कपमधून बाहेर; नेमारकडून निवृत्तीची घोषणा, मॅच संपल्यावर दोनच ओळी बोलला पण सर्वांच्या काळजाला भिडल्या
फिफा ‘अंडर-२०’ वर्ल्ड कपच्या गट फेरीतील सामन्यात नॉर्वेचा सामना होंडुराशची होता. १८ वर्षांचा एर्लिंग हालँड उंच आणि तगडा ‘स्ट्रायकर’ मैदानावर उतरला. या सामन्यात नॉर्वेने १२-० विजय मिळवला होता. यामधील ९ गोल एकट्या एर्लिंगने केले होते. या ९ गोलमुळेच तो त्या टूर्नामेंटचा गोल्डन बूट विजेता झाला होता. एर्लिंग हालँडने आजवरच्या करिअरमध्ये जुलै २०२६ पर्यंत क्लबसाठी ४०२ मॅचमध्ये ३१७ गोल आणि नॉर्वे संघासाठी ५४ मॅचमध्ये ६२ गोल केले आहेत, म्हणजे एकूण ३७९ गोल. त्याने मोल्डेसाठी १८, साल्झबर्गसाठी २९, डॉर्टमंडसाठी ८६ आणि मँचेस्टर सिटीसाठी १६२ गोल केले, ज्यात प्रीमियर लीगचे ११२ गोल आणि चॅम्पियन्स लीगचे ३६ गोल आहेत. आपल्या करियमध्ये प्रीमियर लीग टायटन्स, चॅम्पियन्स लीग टायटन्स आणि ३ गोल्डन बूट मिळवले. पण एक गोष्ट अजूनही मिसिंग होती. ती म्हणजे नॉर्वे संघ १९९८ नंतर वर्ल्डकपमध्ये एकदाही क्वालिफाय करू शकला नव्हता.

२०२५ वर्ल्डकप क्वालिफाय कॅम्पेन

नॉर्वे संघाने ८ सामन्यात ८ विजय मिळवले, यामध्ये प्रत्येक सामन्यात एर्लिंग हालँडने गोल केलेले. एर्लिंगने एकूण १६ गोल केले होते. १६ नोव्हेंबर २०२५ San Siro Itly विरूद्ध नॉर्वे ४-१ ने जिंकलं. या सामन्यात एर्लिंग दोन मिनिटांत दोन गोल केले. नॉर्वेने तब्बल २८ वर्षांनी वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय केले.
Maharashtra TimesFIFA World Cup Trophy : फुटबॉल विश्वचषकाची किंमत 4 वर्षात तब्बल अडीच पटीने वाढली, 6 किलोहून अधिक सोन्याचे मढलेली ट्रॉफी

नॉर्वेचा वर्ल्डकपमधील प्रवास

नॉर्वे संघाचा पहिला सामना इराकसोबत होता. हा सामना ४-१ने नॉर्वेने जिंकत दमदार सुरूवात केली. यामध्ये पहिले दोन गोल एर्लिंग हालँड याने केले. तर दुसरा सामना सेनेगलवविरूद्ध झाला यामध्येही हालँडने दोन गोल करत इतिहासा रचला. पहिल्या वर्ल्ड कपमध्ये दोन सामन्यात दोन-दोन करणारा एर्लिंग हालँड गेल्या ५० वर्षांतील दुसरा खेळाडू ठरला. तिसऱ्या सामन्यामध्ये फ्रान्सने १-४ ने मात करत नॉर्वेला पराभवाचा पहिला झटका दिला. त्यानंतर चौथा सामना ब्राझीलसोबत होता, कोणी विचारही केला नव्हता की पाचवेळा विजेत्या राहिलेल्या ब्राझीलचा पराभव होईल. नॉर्वेकडून हालँडने दोन गोल करत संघाला जिंकवले. जेव्हा जागतिक फुटबॉलमधील अनपेक्षित निकालांची चर्चा होईल यामध्ये आता फिफा वर्ल्ड कप २०२६ मधील ब्राझीलविरुद्ध एर्लिंग हालँड केलेल्या कामगिरीची नक्कीच आठवण काढली जाईल.

दरम्यान, एर्लिंग हालँड नॉर्वेजियन फुटबॉलचा इतिहास नव्याने घडवत आहे. ब्राझीलसारख्या बलाढ्य संघाचा पराभव केल्यानंतर छोट्याशा शहरातून आलेला हा तरुण लाखो फुटबॉल चाहत्यांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. नॉर्वेचं मिशन वर्ल्डकपमध्ये कुठपर्यंत मजल मारणार की ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा