नाशिकला आज रेड अलर्ट देण्यात आला असून नाशिक मनपा परिक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून एकाच दिवसात 300 मिलिमीटर पेक्षा जास्त इतका विक्रमी पाऊस पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काल रात्रीपासून या भागात पावसानं जोर धरला असून सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. तर अहिल्यानगर जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात पावसाला सुरूवात झालीय. या दरम्यान गंभीर अलर्ट नसतानाही भंडारदरा धरण परिसरात नाशिकला देण्यात आलेल्या रेड अलर्टसारखाच 24 तासात तब्बल 300 मिलीपेक्षा जास्त पाऊस कोसळला. या व्हिडिओतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, पालघरमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाला कारणीभूत ठरलेला एक भोवरा नाशिकच्या दिशेनं कूच करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र, हा भोवरा आता वेगळ्याच दिशेने वळालाय. हे सगळं काय प्रकरण आहे, नाशिकमध्ये काय घडतंय सगळं व्हिडिओमधून पाहा.Nashik has been placed under a Red Alert today, and all schools and colleges in the Nashik Municipal Corporation area have been declared closed.Heavy, cloudburst-like rainfall is expected in Nashik and the Trimbakeshwar region, with meteorologists predicting a record-breaking 300 mm or more rainfall in a single day. Rain has been intense since last night, and by morning, heavy showers have already been recorded in many areas.Meanwhile, Ahmednagar (Ahilyanagar) district has been issued a Yellow Alert, and rainfall has already begun in the district.Interestingly, even though no severe alert was issued for the area, the Bhandardara dam region received extremely heavy rainfall — similar to the Red Alert conditions in Nashik — with over 300 mm of rain in just 24 hours.Another important point in this video: A low-pressure vortex (Bhovarya) that was responsible for the heavy rains in Palghar was earlier expected to move towards Nashik. However, it has now changed direction and moved elsewhere.