Headlines

Mumbai High Court Orders to BEST Pay Retired Employees their Dues; ‘सापत्न वागणूक देणे अस्वीकारार्ह’; निवृत्त कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ला खडसावले, नेमकं प्रकरण काय?


Mumbai High Court on Best Retired Employee : एकूण थकबाकीपैकी ९२.१० टक्के रक्कम याचिकाकर्त्यांना अदा करण्यात आली असून उर्वरित ८२ कोटी रुपये वितरित करणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ती रक्कम दोन महिन्यांच्या आत वितरित करावी, असे निर्देश खंडपीठाने ‘बेस्ट’ला दिले.

Mumbai High Court on Best Retired Employee
उच्च न्यायालय बेस्ट निवृत्त कर्मचारी वेतन(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे सेवा बजावल्यानंतर निवृत्तीपश्चात आपल्या कायदेशीर हक्कापासून निवृत्तांनी वंचित राहणे दुर्दैवी आहे. संस्थेच्या इतर विविध मोठ्या आर्थिक खर्चाच्या कामकाजांना नियमित प्राधान्य दिले जात असताना, स्वतःच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीविषयक आर्थिक हक्कांच्या अशी सापत्न वागणूक कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह ठरू शकत नाही’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

थकबाकीची रक्कम त्वरित देण्याचा आदेश

त्याचबरोबर निवृत्त कर्मचारी असलेल्या ६१ याचिकाकर्त्यांना त्यांची पेन्शन, ग्रॅच्युईटी व निवृत्तीपश्चात लाभांची थकबाकीची रक्कम त्वरित देण्याचा आदेश ‘बेस्ट’ उपक्रमाला दिला. निवृत्तीनंतर वैधानिक हक्क असूनही त्यापासून वंचित असल्याबद्दल या निवृत्तांनी ज्येष्ठ वकील गायत्री सिंग, ॲड. आर. डी. भट्ट, ॲड. प्रिया चौबे, ॲड. लुब्धा भोईर, ॲड. क्रांती एल. सी. यांच्यामार्फत रिट याचिकांद्वारे दाद मागितली होती. त्याविषयीच्या सुनावणीअंती गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
Maharashtra TimesMankhurd Building Collapse: रोज कुशीत झोपणारी माझी लाडकी लेक कायमची गाढ झोपून गेली; मुंबईतील बापाने हंबरडा फोडला, दुर्घटनेत सर्वस्व गमावलं!

खंडपीठाने काय नमूद केलं?

देशातील सर्वाधिक यशस्वी व प्रतिष्ठित सार्वजनिक संस्थांपैकी एक असताना बेस्ट उपक्रमाने आपल्या कर्मचाऱ्यांप्रति असलेली वैधानिक जबाबदारी पार पाडण्यात अशी उदासीनता दाखवणे खेदजनक असल्याचे खंडपीठाने नमूद केले. प्रशासनाने निवृत्तीपश्चातचे लाभ देणे हे माजी कर्मचाऱ्यांवर कृपा नाही. तो त्यांचा वैधानिक हक्क आहे. तो मिळविण्यासाठी त्यांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागते, हे दुर्दैवी आहे.

‘बेस्ट’च्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी

त्यांच्याप्रति अशी दुर्लक्षिताची भावना त्यांच्या मूलभूत मानसन्मानावर आणि विशेषतः आयुष्याच्या उत्तरार्धातील उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम करणारी आहे. कोणताही सुसंस्कृत समाज सार्वजनिक सेवेत आयुष्यभर कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे दडपलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या अवस्थेत सोडून देण्याची अपेक्षा करू शकत नाही’, अशा शब्दांत खंडपीठाने ‘बेस्ट’च्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
Maharashtra TimesPune Rain Alert: पुण्यात ६ दिवसांत पावसाने बॅकलॉग भरून काढला, आणखी दोन दिवस जोरदार बरसणार; IMD चा अंदाज

प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनाही होणार फायदा

दरम्यान, बेस्ट उपक्रमाचे रुतलेले चाक बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करूनही प्रशासनाच्या कारभाराला गती मिळत नाही. याचा प्रवाशांसोबत, कर्मचाऱ्यांनाही फटका बसत आहे. या आर्थिक कोंडीतून ‘बेस्ट’ला बाहेर काढण्यासाठी उपक्रमाचे मुंबई महापालिकेतच विलीनीकरण करण्याचा विचार आता पुन्हा एकदा जोरकसपणे पुढे आला असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकाही यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा