Headlines

landslide on mumbai-pune railway route multiple trains canceled and routes changed


मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मध्य रेल्वे विभागाकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

mumbai-pune railway
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे मुंबई-पुणे रस्ते मार्ग बंद झाला. मिसिंग लिंकवर दरड कोसळळ्याने मिसिंग लिंकचादेखील मार्ग बंद झाला. तसेच मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरदेखील दरड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला. परिणामी मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. तसेच अनेक गाड्या यादुसरीकडे वळवण्यात आल्या. तर काही गाड्यांचा थांबा हा शॉर्ट टर्मिनेशन करण्यात आला.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा-कर्जत विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दरड कोसळलेला भाग दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. पण रेल्वे मार्ग सुरळीत होत नाही तोपर्यंत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

भूस्खलनामुळे रेल्वे वाहतुकीवर झालेला परिणाम खालीलप्रमाणे आहे:

  • रद्द केलेल्या गाड्या – १७
  • मार्ग बदललेल्या गाड्या – ३१
  • शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या – १८
  • शॉर्ट ओरीजनेट केलेल्या गाड्या – १५
  • वेळापत्रक बदललेल्या गाड्या – ४

6 जून रोजी प्रवास सुरू करणाऱ्या रद्द केलेल्या गाड्या – १७

  • १. गाडी क्रमांक 22105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंद्रायणी एक्सप्रेस
  • २. गाडी क्रमांक 12169 पुणे – सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस
  • ३. गाडी क्रमांक 12170 सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
  • ४. गाडी क्रमांक 22106 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी एक्सप्रेस
  • ५. गाडी क्रमांक 12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
  • ६. गाडी क्रमांक 12128 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस
  • ७. गाडी क्रमांक 11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन एक्सप्रेस
  • ८. गाडी क्रमांक 11008 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस
  • ९. गाडी क्रमांक 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस
  • १०. गाडी क्रमांक 12123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
  • ११. गाडी क्रमांक 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
  • १२. गाडी क्रमांक 12125 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे प्रगती एक्सप्रेस
  • १३. गाडी क्रमांक 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
  • १४. गाडी क्रमांक 11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे सिंहगड एक्सप्रेस
  • १५. गाडी क्रमांक 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्सप्रेस
  • १६. गाडी क्रमांक 11012 धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • १७. गाडी क्रमांक 12115 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर एक्सप्रेस

मार्ग बदललेल्या गाड्या – ३१

  • १. गाडी क्रमांक 11049 अहमदाबाद – कोल्हापूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) – कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे मार्गे
  • २. गाडी क्रमांक 22944 इंदूर – दौंड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) – कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे
  • ३. गाडी क्रमांक 12297अहमदाबाद – पुणे दुरंतो एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे मार्गे
  • ४. गाडी क्रमांक 22144 बिदर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे
  • ५. गाडी क्रमांक 17614 हुजूर साहिब नांदेड – पनवेल एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे
  • ६. गाडी क्रमांक 20915 चेरलापल्ली – इंदौर हमसफर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – मनमाड – जळगाव – पालधी- सुरत मार्गे
  • ७. गाडी क्रमांक 16554 लोकमान्य टिळक टर्मिनस – सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) कर्जत – पनवेल – कल्याण – कसारा – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे
  • ८. गाडी क्रमांक 22193 दौंड-ग्वाल्हेर सुपरफास्ट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) लोणावळा – पुणे – दौंड कॉर्ड लाईन – अंकाई – भुसावळ – खंडवा मार्गे
  • ९. गाडी क्रमांक 22158 चेन्नई एग्मोर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड मार्गे – अंकाई – मनमाड – इगतपुरी – कसारा – कल्याण
  • १०. गाडी क्रमांक 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – अंकाई – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे
  • ११. गाडी क्रमांक 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – अंकाई – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे
  • १२. गाडी क्रमांक 12164 चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – अंकाई – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे
  • १३. गाडी क्रमांक 16587 यशवंतपुर- बीकानेर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – मनमाड – जळगाव – पालधी – सुरत मार्गे
  • १४. गाडी क्रमांक 09420 तिरुचिरापल्ली – अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – मनमाड – जळगाव – पालधी – सुरत मार्गे
  • १५. गाडी क्रमांक 20953 चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – मनमाड – जळगाव – पालधी – सुरत मार्गे
  • १६. गाडी क्रमांक 16534 बेंगळुरू – जोधपूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – मनमाड – जळगाव – पालधी – सुरत मार्गे
  • १७. गाडी क्रमांक 20496 हडपसर – जोधपूर एक्सप्रेस(प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड कॉर्ड लाईन – मनमाड – जळगाव – पालधी – सुरत मार्गे
  • १८. गाडी क्रमांक 20495 जोधपूर – हडपसर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) सुरत – पालधी – जळगाव – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन मार्गे
  • १९. गाडी क्रमांक 11092 पुणे – भुज एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड – मनमाड – जळगाव – पालधी – सुरत मार्गे
  • २०. गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे
  • २१. गाडी क्रमांक 12298 पुणे – अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे
  • २२. गाडी क्रमांक 22943 दौंड – इंदूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड – मनमाड – जळगाव – पालधी – सुरत मार्गे
  • २३. गाडी क्रमांक 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्सप्रेस(प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे
  • २४. गाडी क्रमांक 22179 लोकमान्य टिळक टर्मिनस – चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७-.२०२६) कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे
  • २५. गाडी क्रमांक 11019 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे
  • २६. गाडी क्रमांक 16588 बिकानेर – यशवंतपूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) सुरत – पालधी – जळगाव – मनमाड – दौंड मार्गे
  • २७. गाडी क्रमांक 22920 अहमदाबाद – चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) सुरत – पालधी – जळगाव – मनमाड – दौंड मार्गे
  • २८. गाडी क्रमांक 22717 राजकोट – सिकंदराबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) सुरत – पालधी – जळगाव – मनमाड – दौंड मार्गे
  • २९. गाडी क्रमांक 12163 लोकमान्य टिळक टर्मिनस – चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे
  • ३०. गाडी क्रमांक 16531 अजमेर – बेंगळुरू एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) सुरत – पालधी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे मार्गे
  • ३१. गाडी क्रमांक 12264 हजरत निजामुद्दीन – पुणे एक्स्प्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) सुरत – पालधी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे मार्गे

शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या – १८

  • १. गाडी क्रमांक 20822 संतरागाछी – पुणे हमसफर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०४.०७.२०२६) पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट
  • २. गाडी क्रमांक 12116 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिद्धेश्वर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
  • ३. गाडी क्रमांक 12702 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेन सागर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) लोणावळा येथे शॉर्ट टर्मिनेट
  • ४. गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०४.०७.२०२६) लोणावळा येथे शॉर्ट टर्मिनेट
  • ५. गाडी क्रमांक 11140 होसपेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) तळेगाव येथे शॉर्ट टर्मिनेट
  • ६. गाडी क्रमांक 11042 साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
  • ७. गाडी क्रमांक 17317 हुबळी – दादर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
  • ८. गाडी क्रमांक 17412 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
  • ९. गाडी क्रमांक 01492 हजरत निजामुद्दीन – पुणे विशेष (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०४.०७.२०२६) कर्जत येथे शॉर्ट टर्मिनेट
  • १०. गाडी क्रमांक 11027 दादर – सातारा एक्स्प्रेस कर्जत येथे शॉर्ट टर्मिनेट
  • ११. गाडी क्रमांक 11036 म्हैसूर – दादर एक्स्प्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) चिंचवड येथे शॉर्ट टर्मिनेट
  • १२. गाडी क्रमांक 22731 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
  • १३. गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
  • १४. गाडी क्रमांक 16352 नागरकोइल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड येथेशॉर्ट टर्मिनेट
  • १५. गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) खडकी येथे शॉर्ट टर्मिनेट
  • १६. गाडी क्रमांक 11302 बेंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) सोलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट
  • १७. गाडी क्रमांक 04725 हिसार – खडकी स्पेशल (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) वसई रोड येथे शॉर्ट टर्मिनेट
  • १८. गाडी क्रमांक 17614 नांदेड – पनवेल एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) इगतपुरी येथे शॉर्ट टर्मिनेट

शॉर्ट ओरीजनेट केलेल्या गाड्या – १५

  • १. गाडी क्रमांक 20821 पुणे – संतरागाछी हमसफर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पनवेल येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • २. गाडी क्रमांक 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – केएसआर बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • ३. गाडी क्रमांक 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) लोणावळा येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • ४. गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) लोणावळा येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • ५. गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • ६. गाडी क्रमांक 11027 दादर – सातारा एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • ७. गाडी क्रमांक 17318 दादर – हुबळी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • ८. गाडी क्रमांक 17411 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • ९. गाडी क्रमांक 11005 दादर – पुद्दुचेरी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६ रोजी पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • १०. गाडी क्रमांक 12701 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • ११. गाडी क्रमांक 22225 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • १२. गाडी क्रमांक 16351 लोकमान्य टिळक टर्मिनस – नागरकोईल एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • १३. गाडी क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – होस्पेट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) खडकी येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • १४. गाडी क्रमांक 04726 खडकी – हिसार स्पेशल (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) वसई रोड येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
  • १५. गाडी क्रमांक 17613 पनवेल – नांदेड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) इगतपुरी येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.

गाड्यांच्या वेळापत्रकात बदल – ४

  • १. गाडी क्रमांक 18520 – लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दिनांक ०६.०७.२०२६ रोजी ०९:५५ वाजता सुटेल (नियोजित वेळ ०६:५५).
  • २. गाडी क्रमांक 11029 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोयना एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दिनांक ०६.०७.२०२६ रोजी ११:४० वाजता सुटेल (नियोजित वेळ ०८:४०).
  • ३. गाडी क्रमांक 20706 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नांदेड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दिनांक ०६.०७.२०२६ रोजी १५:१५ वाजता सुटेल (नियोजित वेळ १३:१५).
  • ४. गाडी क्रमांक 22943 – दौंड – इंदूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दिनांक ०६.०७.२०२६ रोजी २०:१० वाजता सुटेल (नियोजित वेळ १४:१०)
चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा