Headlines

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी प्रथमच ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’; Emergency स्थितीत वेळेत उपचार मिळणार, आरोग्य विभागाचा निर्णय


म. टा. प्रतिनिधी, पुणे : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने यंदा प्रथमच ‘एअर ॲम्ब्युलन्स’ची (हेलिकॉप्टर रुग्णवाहिका) सेवा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासोबतच संपूर्ण पालखी मार्ग डिजिटल यंत्रणेने जोडणारे आरोग्यसंपन्न वारी हे विशेष मोबाइल ॲपही यंदा सादर केले जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांना आपत्कालीन स्थितीत तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य होईल.

वारीमार्गावर आपत्कालीन स्थितीत तातडीने उपचार देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ‘बाइक ॲम्ब्युलन्स’चा वापर करण्यात येत आहे. मात्र, हृदयविकार, पक्षाघात किंवा अपघात झाल्यास तातडीने उपचार देणे गर्दीमुळे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे ‘एअर ॲम्ब्युलन्स’चा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra TimesPune Rain: पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’! जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
वारीदरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ ठिकाणी अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधा आणि १५६ प्राथमिक उपचार केंद्रे कार्यरत राहणार आहेत. पंढरपूरमध्येही अतिरिक्त आयसीयू कक्ष, महाआरोग्य शिबिर आणि २४ तास वैद्यकीय सेवा असणार आहे.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंगी, मलेरियावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, अन्न विक्रेत्यांची आरोग्य तपासणी आणि आरोग्य जनजागृतीवर विशेष भर देण्यात येणार आहे.

Maharashtra TimesPune News: मावळात रस्ता फुटला? व्हायरल व्हिडिओबाबतचे सत्य अखेर समोर; विकासकामांचा भांडाफोड, टेस्टिंगमध्येच उघड झाला घोळ!
‘एअर अॅम्ब्युलन्स’चा वापर कधी ?
आषाढी एकादशी २५ जुलै रोजी आहे. त्यानुसार २२ ते २९ जुलै या कालावधीत सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत ‘एअर ॲम्ब्युलन्स’ची सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने निविदा काढली असून, येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होणार आहे. आपत्कालीन स्थितीत गंभीर रुग्णांना हेलिकॉप्टरद्वारे जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर येथील हेलिपॅडचा वापर करण्यात येणार आहे.

वारकरी वारीसाठी रातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत पोहोचेपर्यंत आरोग्याच्या आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. –प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत