Headlines

IMD Issue Alert For Vidarbha Heavy Rainfall Chances in Next 48 Hours


विदर्भात थांबलेला पाऊल पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील 48 ते 72 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून गोंदिया, भंडारामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Vidarbha Rain
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, अहिल्यानगर, सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच आता विदर्भाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

विदर्भात पावसाचा जोर वाढणार

विदर्भातील काही भागांत पुढील 48 ते 72 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, अकोला, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिणेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम विदर्भावर होत असून त्याच्या प्रभावामुळे पावसाच्या सरी तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

हवामान विभागाने काय म्हटलंय?

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील वातावरण पावसासाठी अनुकूल राहणार आहे. विशेषतः गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Vidarbha Rain

100 मिमी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज

काही ठिकाणी 100 मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ शकते. तसेच नागपूर, अकोला, अमरावती आणि परिसरातील जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतीच्या दृष्टीने हा पाऊस लाभदायक ठरण्याची शक्यता असून, अतिवृष्टी होणाऱ्या भागांमध्ये मात्र खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यातील इतर भागात काय स्थिती राहणार?

दरम्यान, राज्याच्या इतर भागांतही पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील ४८ तासांतही या भागांत जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने मुंबईतील काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

Vidarbha Rain

हवामान विभागाचे महत्त्वाचे आवाहन

हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा