Headlines

Nashik Rain Alert IMD Issue Cloudburst in Igatpuri And Trimbakeshwar


नाशिकमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर मंदिर, सप्तश्रृंगी देवस्थान आज सायंकाळपासून बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. नाशिक, इगतपुरी, पेठ, त्रंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

nashik rain alert
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी पुराचे पाणी गावात शिरल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या पावसाचा प्रकोप हा 8 जुलैपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तीन तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे. यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

“नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या तीन तालुक्यात जास्त पावसाची शक्यता आहे. पेठ, दिंडोरी, कळवण, सटाणा, बागलाण या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. पण कमी वेळात अतिमुसळधार पाऊस, ज्याला आपण ढगफुटी म्हणतो तसा पाऊस त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इगतपुरी परिसरात पडण्याची शक्यता आहे. नाशिक शहराच्या पश्चिम भागात जास्त पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून हवामान इशारा मिळेल तसा आपल्याला नेमका कुठे जास्त पाऊस पडणार याची माहिती अधिक स्पष्टपणे मिळेल”, असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.

सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शेतकऱ्यांना घरी राहण्याचं आवाहन

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सर्व गोष्टींचं नियोजन केलं जात आहे. नाशिक महापालिका आयुक्त आणि महापौर शहर भागातील पूर परिस्थितीवर नियोजन करणार आहे. तर ग्रामीण भागात नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुका या भागातील सर्व शाळा, कॉलेज उद्या बंद राहणार आहे. उद्या मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जाणं टाळावं. अतिआवश्यक नसेल तर प्रवास करणं टाळावं”, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

काही रस्ते बंद राहणार

“ज्या भागांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे ते रस्ते बंद केले जाणार आहेत. त्याची यादी PWD, राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस विभाग यांच्याकडून जारी केली जाईल. शेतकऱ्यांना विनंती आहे की, कारण नसताना घराबाहेर पडू नये”, असं आवाहनदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगी देवस्थान बंद राहणार

“उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थान बंद ठेवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर शेवटची पूजा राहणार आहे.त्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान परवापर्यंत बंद राहणार आहे. भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वरला येणं टाळावं. तसेच सप्तश्रृंगी मंदिराच्या परिसरात 65 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सप्तरश्रृंगी देवस्थान उद्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत”, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

“ज्या ठिकाणी पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे त्या गावांची यादी तयार करण्यात आली. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाण्याचा प्रवाहाला जाण्यास कोणता अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत”, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा