Headlines

Nashik Rain: मालेगावात घराचा स्लॅब कोसळला; आजीसह 21 वर्षीय नातवाचा करुण अंत, नात गंभीर जखमी


Nashik Rain House Slab Collapse: मुसळधार पावसात कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घराचा स्लॅब कोसळून आजी व नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर यात १८ वर्षीय प्रणिता गंभीर जखमी आहे.

nashik rain
स्लॅब कोसळून आजी नातवाचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, मालेगाव: शहर व तालुक्यात झालेल्या पहिल्याच दमदार पावसात शहरातील कलेक्टर पट्‌टा भागातील घराचा स्लॅब कोसळून आजी व नातवाचा मृत्यृ झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात विमलबाई येवले (वय ७४) व चेतन येवले (२१) या आजी-नातवाचा मृत्यू झाला, तर प्रणिता रामचंद्र येवले (वय १८) गंभीर जखमी झाली आहे. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कलेक्टर पट्टा भागातील रुद्र हनुमान मंदिराच्या पुढे राहणाऱ्या राजेंद्र पंढरीनाथ येवले यांच्या घराचा स्लॅब शुक्रवारी दुपारी पाऊस सुरू असताना कोसळला. घरात प्रणिता, चेतन व त्यांची आजी विमलबाई होत्या. शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे घरातील स्लॅब कोसळल्याने प्रणिता, चेतन व विमलबाई गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने बचावकार्य करून तिघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. यात चेतन व त्याची आजी विमलबाई येवले यांचा उपचारादरम्यान मृत्यृ झाला. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra TimesNashik News: ‘डिफेन्स’ अधिकाऱ्याकडे सापडले घबाड; देवळालीच्या तत्कालीन CEOकडे 113 टक्के अधिक अपसंपदा
शाळेवर कोसळले झाड;
३१ विद्यार्थी बचावले

निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शुक्रवारी (दि. ३) दुपारी एकच्या सुमारास शाळेलगतच्या शेतातील मोठे कडुनिंबाचे झाड कोसळल्याची घटना घडली. शाळेत त्या वेळी ३१ विद्यार्थी उपस्थित होते. सुदैवाने झाडाचा केवळ शेंड्याचा भाग इमारतीवर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आणि विद्यार्थी व शिक्षक सुखरूप बचावले. झाड कोसळताना झालेल्या प्रचंड आवाजामुळे विद्यार्थ्यांना वीज पडल्याचा भास झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. मात्र, शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून शांत केले. झाडाच्या फांद्या पडल्याने किरकोळ नुकसान झाले असून, जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
Maharashtra TimesSimhastha Kumbh Mela : 1 हजार 230 कोटींचा निधी, ‘डेडलाइन’ पाळण्यासाठी खालच्या पातळीचं काम; कुंभमेळाच्या तोंडावर नाशिकच्या रस्तेकामांचं धक्कादायक वास्तव समोर
पावसाचा फटका
– मालेगावात स्लॅब कोसळल्याने १८ वर्षांची तरुणी गंभीर जखमी
– ब्राह्मणगाव विंचूर येथील शाळेवर झाड कोसळल्यानंतर विद्यार्थी भेदरले
– धोकादायक वृक्षांची तातडीने छाटणी करण्याची ग्रामस्थांची मागणी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा