Headlines

Mumbai Pune Express Way Missing Link Shut Railway Route closed after Landslide in Khandala Ghat; मुंबई-पुणे वाहतूक बंद! रेल्वेमार्गावर दरड कोसळली, मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर स्लॅब पडला; तर एक्स्प्रेस वेही ठप्प


Mumbai Pune Express Way Close : मुंबई पुणे रेल्वेमार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली, तर मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर स्लॅब पडला, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे, तर जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने चारही मार्ग ठप्प झाले आहेत.

Mumbai Pune Traffic Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बंडू येवले, पुणे : मुंबई -पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला असून काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने जोराचे वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर लोणावळ्यासह मावळमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मुंबई पुणे रेल्वेमार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली, तर मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर स्लॅब कोसळला, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे, तर जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने चारही मार्ग ठप्प झाले आहेत.

मुंबई पुणे मार्गावर रस्ते आणि रेल्वे वाहतूक बाधित

दरड कोसळल्यामुळे आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक थांबवण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे.
Maharashtra TimesBandra East Deck : गरीबनगरची झोपडपट्टी हटवली, आता वांद्रे पूर्वेला 300 स्क्वेअर मीटरचा आधुनिक डेक, 700 प्रवाशांची क्षमता, गर्दीवर भन्नाट तोडगा

प्रवास टाळा, प्रशासनाच्या सूचना

‘पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांना पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास टाळण्याची विनंती करण्यात येत आहे. ज्यांचा प्रवासाचा बेत आहे, त्यांनी आपला प्रवास पुढे ढकलावा आणि सरकारी यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अपडेटेड माहितीचे पालन करावे. जनहित आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो.’ असे सूचनावलीत म्हटले आहे.

मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरातील काही भागांत व रस्त्यांवर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे; या भागात पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या पर्यायी मार्गांचाही समावेश होतो.

Sachin Ahir यांनी ठाकरेंची साथ सोडली, नेटीझन्स भडकले अन् बापासाठी लेक धावून आली

पुढील सूचना मिळेपर्यंत खालील मार्ग बंद करण्यात आले आहेत:

१. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग- काँक्रीटचा खांब पडल्यामुळे ‘कनेक्टिंग लिंक’ आणि ‘मिसिंग लिंक’ दरम्यानचा मार्ग.

२. जुना पुणे-मुंबई महामार्ग – काही ठिकाणी पाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे.

३. लोहगड किल्ल्याजवळील पाटण गावात दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत एका कुटुंबाला फटका बसल्याचे समजते. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
Maharashtra TimesVande Bharat : वेगवान वंदे भारतमुळे उड्डाणपुलावर फवारे, व्हिडिओ खरा की AI? ‘परे’-‘मरे’च्या परस्पर विरोधी दाव्यांनी संभ्रम

कशेडी घाटात नव्या मार्गावर कोसळली दरड, मुंबई गोवा महामार्ग ठप्प

दुसरीकडे, खेड-कशेडी घाटात नव्या महामार्गावर मोठी दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. हॉटेल अनुसयापासून 100 मीटरवर मोठी दरड कोसळली. घटनास्थळी जेसीबी दाखल असून खेड रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचले आहेत. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून एकेरी वाहतूक चालू होण्याची शक्यता आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा