Headlines

Uddhav Thackeray Protest in Dadar Over Ayodhya Ram Mandir Trust Case


उद्धव ठाकरे यांनी दादर येथील राम मंदिरात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण केलं. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना राज्यातील गावागावात रामरक्षा पठण करण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी भाजपवर सडकून टीका देखील केली.

uddhav thackeray
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादरमध्ये राम मंदिरात रामरक्षा पठण करत अनोखं आंदोलन केलं. रामरक्षा पठण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळी राम मंदिर परिसरात शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केलेली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच आता हिंदू माफ करणार नाही, असंदेखील उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्व हिंदूंना रामरक्षा पठण करण्याचं आवाहन केलं.

आम्ही कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत.आम्ही हिंदू भोळे, भाबडे आहोत, पण मुर्ख नाहीत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कुणी मंदिर लुटत असेल तर आता हिंदू माफ करणार नाही. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं, मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असेल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

‘बाळासाहेब हिंदूंच्या पाठी उभे राहिले’

शिलापूजन, रथयात्रा, कारसेवा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं. अनेकांचे जीव गेले. त्यानंतर जे घडलं, मुंबई शहराने जे भोगलं, असं क्वचित कुठल्या शहराने भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, तेव्हा फक्त एकच माणूस हिंदूंच्या पाठी उभा राहिला ते म्हणजे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला’

आता नको ती लोकं सत्ता भोगत आहेत. हिंदू आजही भरडला जातोय. 12 वर्षे होऊन गेली. आपण ज्यांच्यासाठी मेहनत केली होती ते पंतप्रधानपदी बसले. बसल्यानंतर कट्टर कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला संपवण्याचा जणू काही अफजलखानी विडा त्यांनी उचलला. का उचलला? कारण शिवसैनिकांचा गैरफायदा त्यांना घ्यायचा होता. कारण एकच शिवसेना अशी आहे की, जी समोर उभी राहून प्रश्न विचारु शकते, असा दावा त्यांनी केला.

‘हे दुर्भाग्य आहे’

हिंदूंना लुटणारं सरकार तिथे बसलं आहे हे आपले दुर्भाग्य आहे. असे आरोप अनेक जण करत आहेत. शंकराचार्यांनी दोन वर्षांपूर्वी आरोप केला होता की, केदारनाथ मंदिरातील अनेक किलो सोनं चोरी झालं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले की, त्यांनी उज्जैनच्या सर्व जमिनी ढापल्या आहेत. अयोध्येतून अशा बातम्या येत आहेत की, या लोकांची शिसारी येते. बद्रीनाथ येथूनही चोरीच्या बातम्या येत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

uddhav thackeray

कुठे गेलं दान?

अयोध्येत एक IAS अधिकारी जे पूर्वी गृहसचिव होते, त्यांनी आईचे दागिने वितळले आणि जवळपास एक किलोचं रामचरितद माणस मंदिरात दिलं होतं. आपण शिवसेनेने तिकडे फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून देणगी दिली होती. संपूर्ण समाजाने दान केलं होतं. कुठे गेलं हे सर्व? असा सवाल ठाकरेंनी केला.

हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटली पाहिजे, ठाकरेंचा निशाणा

साधू, महंत म्हणतात की, आम्ही जेव्हा मंदिर दर्शनाला जातो तेव्हा आमची लंगोटदेखील चेक केली जाते. साधू संतांशी तुम्ही असं वागताय आणि तिथले पैसे तुम्ही गायब करताय. हिंदू म्हणून घ्यायची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असा घणाघात ठाकरेंनी केला.

जेव्हा हिंदू भीतीग्रस्त होते तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, गर्व से कहो मैं हिंदू हैं. ही पावसाळ्यात पेटलेली ठिणगी आहे. रामभक्त राज्यकर्त्यांना कळलं नसेल तर त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो, प्रभू श्रीरामांबरोबर वानर सेना होती. त्या वानरसेनाने रावणाची सोन्याची लंका जाळून टाकली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘अन्यायाची लंका जाळून खाक करु’

तुम्ही आमचा आज पक्ष चोरला असेल, आमच्याकडचं प्रभू श्रीरामांचं धनुष्य चोरलं असेल, पण आज आमच्या हातात हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती ती मशाल आमच्या हाती आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धार ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरेंचं देशाला आवाहन

अयोध्या चोरी प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चोरी झाली पाहिजे. नाहीतर चार दिवसांत तपास केला जाईल आणि क्लीन चीट दिली जाईल. मी देशातील तमाम हिंदूत्ववादींना विनंती करतोय, जागी व्हा. आज हिंदूंना संमोहित केलं जात आहे. तुमचा गैरफायदा घेतला जात आहे. भोळेपणा सोडा. सर्वांनी आमच्यासोबत रामरक्षा करण्यासाठी रस्त्यावर या, असं उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.

uddhav thackeray

ही ठिणगी गावागावात दिसली पाहिजे. जिथे-जिथे राममंदिर असेल, हनुमान मंदिर असेल तिथे रामरक्षा पठण करा. महाराष्ट्र रामरक्षा करण्यासाठी पुढे जात आहे. चला चोरांना तडीपार करुयात. अब हिंदू माफ नहीं करेगा. तुमचं मोहनशास्त्र आमच्यावर चालणार नाही. प्रभू रामांचे जप केल्यावर भूत पळून जातात. मग हे कोण आहेत? अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा