Headlines

Most Expensive Countries Cost of Living; वाढत्या महागाईने सर्वच हैराण; सौंदर्याची खाण पण जगातील महागड्या देशांमध्ये राहणे-खाणे आणि फिरायला लागतील लाखो रुपये

Cost of Living Index 2026: जगात असे काही देश आहेत जिथं रहाणे आणि प्रवास करणं खूप महाग आहे. अशाच जगातील काही महाग देशांबद्दल जाणून घेऊया. या देशांमध्ये घरांच्या किमती सर्वात मोठा प्रभाव टाकणारा घटक असून राहण्याचा खर्च जास्त आहे, पण अनेक ठिकाणी जास्त पगार आणि उत्तम सेवांमुळे खर्चाची भरपाई होते.

Most Expensive Countries Cost of Living 2026
जगातील महागड्या देशांमध्ये राहणे-खाणे आणि फिरायला लागतील लाखो रुपये
Expensive Countries in the World: जगातील काही देश आपल्या स्वस्त पर्यटनासाठी ओळखले जातात, तर काही देश सर्वात महागड्या ठिकाणांपैकी आहेत. या देशांमध्ये आठवड्याच्या वास्तव्याचा खर्च अनेक ठिकाणच्या अख्ख्या सुट्टीपेक्षा जास्त होऊ शकतो. जागतिक राहणीमान खर्च निर्देशांक आणि पर्यटन अहवालानुसार, आपल्या निसर्गरम्य देखाव्यासाठी ओळखला जाणारा युरोपमधील एक देश सर्वात जगातील सर्वात महागड्या देशांपैकी आहे.

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंडचा Cost of Living Index 109.8 आहे, ज्यामुळे युरोपमधील हा देश जगातील सर्वात महागड्या देशांपैकी बनला आहे. उच्च-गुणवत्तेच्या सेवा, उत्कृष्ट अन्न आणि महागड्या घरांमुळे येथील राहणीमानाचा उच्च खर्च प्रामुख्याने आहे पण प्रचंड पगार, उत्कृष्ट दर्जाच्या सार्वजनिक सेवा आणि सामाजिक सुरक्षा चांगल्या दर्जाच्या असल्यामुळे येथील नागरिकांचे राहणीमान सुनिश्चित करते. येथे एका आठवड्यासाठी 1.75 लाख ते 2.6 लाख रुपये म्हणजे प्रत्येक दिवसाला 25000 ते 37000 रुपये खर्च होऊ शकतो.

नॉर्वे सुद्धा खूप महाग

नॉर्वे सुद्धा खूप महाग

नॉर्वेमध्येही तुम्हाला पर्यटनासाठी जायचे असेल तर, मोठा बजेट तयार करावा लागेल. जास्त मूल्यवर्धित कर, महागडे किराणा सामान आणि वाढलेला मजुरीचा खर्च या कारणांमुळे येथे 7 दिवसांच्या ट्रिपसाठी साधारणपणे 1.61 लाख ते 2.21 लाख रुपये खर्च होऊ शकतो.

बर्मुडा-आइसलँड ही महागडी बेटे

बर्मुडा-आइसलँड ही महागडी बेटे

बर्मुडा आणि आइसलँड मनमोहक निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत, पण त्याचबरोबर तिथे प्रवासासाठी प्रचंड खर्च करावा लागेल. पर्यटकांना एका आठवड्यासाठी 1.47 लाख ते 2.17 लाख म्हणजे दररोज सरासरी 21000 ते 31000 खर्च अपेक्षित आहे. बर्मुडाचा Cost Of Living इंडेक्स 135.8 आहे.

आइसलँडचा Cost of Living Index

आइसलँडचा Cost of Living Index

तर, आइसलँडचा 97.6 आहे. दोन्ही बेटे आयात केलेल्या अन्न आणि ग्राहकोपयोगी वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. किनारपट्टीवरील स्थान आणि मर्यादित लोकसंख्या यामुळे आइसलँडमध्ये जास्त महागाई आहे. बहुतेक वस्तू आयात कराव्या लागत असल्याने अन्न आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होतात. तसेच वाढत्या पर्यटनामुळे रेक्याविकमधील किमती सतत वाढत आहेत.

अमेरिकी शहरांचा दौराही महाग

अमेरिकी शहरांचा दौराही महाग

न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया या सारख्या अमेरिकेतील आकर्षक शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. एका आठवड्याच्या ट्रिपसाठी साधारणपणे 1.05 लाख रुपये ते 1.75 लाख रुपये खर्च होऊ शकतो.

केमन बेटे

केमन बेटे

केमन बेटे जगातील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी असून इथे Cost of Living निर्देशांक 100 च्या खूप वर आहे. या बेटावर बहुतेक वापराच्या वस्तू आयात केल्या जातात त्यामुळे, राहणीमानाचा खर्च अमेरिकेपेक्षा अंदाजे 72.7% जास्त आहे.

सिंगापूर आशियातील सर्वात महागडे ठिकाण

सिंगापूर आशियातील सर्वात महागडे ठिकाण

आशियातील हा देश आकाराने लहान असला तरीही खूप महाग आहे. इथे एका आठवड्याच्या ट्रिपसाठी साधारणपणे 84000 रुपये ते 1.4 लाख रुपये खर्च होऊ शकतो. जमीन मर्यादेत उपलब्ध असल्यामुळे हॉटेलच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा