Headlines

Ghabadkund Box Office Collection Week 2 ; Ghabadkund Box Office : वेलकम टू द जंगल, देऊळबंद 2 च्या तगड्या स्पर्धेत घबाडकुंडची यशस्वी खेळी, दुसऱ्या आठवड्यात कोट्यवधींची कमाई


मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित असतानाही ‘घबाडकुंड’ने प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे. रहस्य, थरार आणि भयाचा अनोखा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकताना दिसत आहेत. ‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘देऊळ बंद 2‘, या मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडचे ‘कॉकटेल’, ‘में वापस आऊंगा’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि हॉलिवूडमधील ‘द ओडिसी’, ‘स्पायडर-मॅन’ तसेच ‘ऑब्सेशन’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही ‘घबाडकुंड’ ने आपल्या वेगळ्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे.

Maharashtra TimesDevendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेटफ्लिक्सवर पाहतायत द ब्लॅकलिस्ट सीरिज, टेलिव्हिजनवरील रिअ‍ॅलिटी शोचेही मोठे चाहते
दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८.१० कोटींची कमाई करत यशाची नवी उंची गाठली असून, आता तिसऱ्या आठवड्यातही दिमाखदार वाटचाल सुरू ठेवली आहे. मराठी, हिंदी आणि हॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘घबाडकुंड’ने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं असून, तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटावरील प्रेक्षकांचे प्रेम कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Maharashtra TimesTanvi Thakkar Divorce : लोकप्रिय अभिनेत्री तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांचा घटस्फोट, साखरपुड्यानंतर 7 वर्षांनी लग्न, मग 5 वर्षांनी काडीमोड!
चित्रपटातील लेखन, दिग्दर्शन, दमदार कलाकारांचा अभिनय, प्रभावी संवाद, पार्श्वसंगीत, तांत्रिक मांडणी आणि उत्कंठावर्धक सादरीकरण या सर्वच बाबींचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. त्यामुळे ‘घबाडकुंड’ची चर्चा सोशल मीडियासह सर्वत्र रंगताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यापासून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये शोची संख्या वाढवण्यात आली असून, अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी आगाऊ बुकिंगलाही मोठा प्रतिसाद दिला आहे.

कुटुंबासह, मित्रमंडळींसोबत आणि ग्रुप बुकिंगद्वारे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे गर्दी करत आहेत. टिकिटिंग प्लॅटफॉर्मवरही ‘घबाडकुंड’ ला प्रेक्षकांकडून उत्कृष्ट रेटिंग मिळत असून, सकारात्मक ‘वर्ड ऑफ माऊथ’मुळे नव्या प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रतिसाद केवळ एका चित्रपटाच्या यशापुरता मर्यादित नसून, मराठी चित्रपटांवर प्रेक्षकांचा वाढता विश्वास आणि दर्जेदार आशयाला मिळणारी दाद अधोरेखित करणारा आहे.

दातांवरून पंचेस, चाहत्यांचं प्रेम; संदीप पाठक यांची भन्नाट किश्श्यांनी भरलेली मुलाखत

‘आयकॉन द स्टाईल’चे निर्माते डॉ. रसिक कदम निर्मित आणि प्रीतम एस. के. पाटील दिग्दर्शित ‘घबाडकुंड’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. रहस्य आणि थराराचा वेगळा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पुन्हा एकदा मोर्चा वळवला असून, तिसऱ्या आठवड्यातही ‘घबाडकुंड’ची यशस्वी घोडदौड कायम राहणार असल्याचा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत