१० हजारांची लाच मागितल्यानं तक्रार झाली, घराची झाडाझडती होणार याचा अंदाज आल्यानं सील बंद घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, पण सामान्य जनतेच्या लाच खोरीतून कमवलेला अफाट पैसा हा शेवटी नियतीला मान्यच नसतो असंच काहीसं घडलं आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याची भांडाफोड झाली. १० हजार रुपयांची लाच घेताना पकडल्या गेलेल्या एका शासकीय अधिकाऱ्याच्या घरातून कोट्यवधी रुपयांचे घबाड बाहेर पडेल, अशी कल्पना कदाचित तपास अधिकाऱ्यांनीही केली नसेल. अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच ACBनं केलेल्या कारवाईने प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे एक विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आणले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा, एसीबीच्या कारवाईचा आणि जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत.