Weather forecast dangerous impact of black carbon on rainfall new research about cloud revealed; ढगांबाबत महत्त्वाचे सर्वेक्षण समोर; आढळले काजळीचे बारीक कण, पावसावर कसा परिणाम होणार? जाणून घ्या
Weather forecast dangerous impact of black carbon on rainfall new research about cloud revealed; ढगांबाबत महत्त्वाचे सर्वेक्षण समोर; आढळले काजळीचे बारीक कण, पावसावर कसा परिणाम होणार? जाणून घ्या
चैत्राली चांदोरकर, पुणे : भारतातील दुष्काळप्रवण आणि पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणाऱ्या नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या ढगांमध्ये ‘रिफ्रॅक्टरी ब्लॅक कार्बन’ म्हणजेच काजळीचे बारीक कण अस्तित्वात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. यासाठी भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिरिओलॉजी) शास्त्रज्ञांनी विमान मोहिमेद्वारे भवतालातील (ॲटमॉस्फिअर) हवेचे, ढगांतील थेंबांचे नमुने घेऊन संशोधन केले आहे. कार्बनचे सूक्ष्म घटक यापुढेही असेच वाढल्यास त्यांच्या उष्णतेमुळे ढगांच्या निर्मितीस अडथळा होऊ शकतो, असा प्राथमिक निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.
‘आयआयएटीएम’च्या ‘क्लाउड एरोसोल इंटरॲक्शन अँड प्रेसीपिटेशन एन्हान्समेंट एक्सपेरिमेंट’ या प्रकल्पांतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे. आर्य पिशारोडी, सचिन पटाडे, मर्सी व्हर्गीज, जोसिन सनल थॉमस, नीलम मालप या संशोधकांच्या गटाने तारा प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास पूर्ण केला. ‘ब्लॅक कार्बन उष्णताशोषक असल्याने त्यांचे अस्तित्व धोकादायक ठरू शकते, असा प्राथमिक अंदाज अहवालात आहे. मराठवाडा, विदर्भासारख्या भागांत ढगांच्या निर्मितीमध्ये आणि पावसाच्या प्रक्रियेत हवेतील प्रदूषके, विशेषतः ब्लॅक कार्बनसारखे कण नेमकी काय भूमिका बजावतात, याचे पुरावे या संशोधनाने दिले,’ असे डॉ. प्रभाकरन यांनी सांगितले.
धोकादायक का?
ब्लॅक कार्बन उष्णता शोषून घेतो. त्यामुळे त्याचे प्रमाण वाढल्यास स्थानिक पातळीवर तापमान वाढते. हे उष्ण कण ढगांच्या आत किंवा जवळ पोहोचल्यानंतर तापमानवाढीमुळे ढगांमधील लहान जलबिंदूंचे पावसाच्या थेंबात रूपांतर होण्याऐवजी त्यांचे बाष्पीभवन होते. याला ‘सेमी-डायरेक्ट इफेक्ट’ म्हणतात. यामुळे पावसाच्या निर्मितीला अडथळा होतो.
संशोधनात काय आढळले?
ढगांच्या खालच्या भागात हवेत ब्लॅक कार्बनचे प्रमाण सर्वाधिक होते. ढगांच्या आत प्रती एक घन सेंटिमीटरमध्ये ०.१ ते १० ब्लॅक कार्बन बाहेरील खुल्या वातावरणाच्या तुलनेत ते १० ते २० पटीने कमी होते. ७ मायक्रॉनपेक्षा मोठ्या जलबिंदूपैकी ३ टक्के जलबिंदूंतच ब्लॅक कार्बन आढळून आले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा