Gold and Silver Rate Today 3 July 2026; घसरत्या सोन्याच्या दराला मोठा ब्रेकडाऊन, किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ; चांदीच्या किमतीत जोरदार तेजी, आजचा भाव काय?
Gold and Silver Rate Today 3 July 2026; घसरत्या सोन्याच्या दराला मोठा ब्रेकडाऊन, किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ; चांदीच्या किमतीत जोरदार तेजी, आजचा भाव काय?
Gold Price Today Update: गेल्या काही दिवसांत विक्रमी नीचांकीवर घसरलेल्या सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजीचा कल पाहायला मिळत आहे. फेडरल रिझर्व्हचे नवनियुक्त अध्यक्ष केविन वॉर्श यांनी व्याजदरात मोठी वाढ अपेक्षित नसल्याचे विधान केल्यानंतर सोन्याच्या दरात तेजीची लाट उसळली आहे. अशाप्रकारे, सलग दुसऱ्या दिवशी घसरत्या सोन्याच्या दराने पुन्हा उभारी घेतली, तर चांदीची किंमतही जोरदार वाढली आहे.
सकारात्मक जागतिक संकेत आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून आक्रमक व्याजदर वाढीच्या अपेक्षा कमी झाल्यामुळे देश-विदेशातील मौल्यवान धातूंना पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. परिणामी शुक्रवार, 3 जुलै रोजी सकाळी MCX वर सोने आणि चांदीच्या किमती 2% पर्यंत उसळी घेऊन व्यवहार करत आहेत.
देशांतर्गत बाजारात, MCX वर, सकाळी 9.22 वाजता सोन्याचे ऑगस्ट फ्युचर्स 1.35 टक्के किंवा 1900 रुपयांनी वाढून 1,47,737 रुपयांवर व्यवहारत होते, तर चांदीच्या किमतीतही 1.64% टक्के म्हणजे 3,700 रुपयांची वाढ झाली आणि भाव 2,32,995 रुपये किलोवर पोहोचला.
दुसरीकडे, अमेरिकी बाजारातही सोन्याची किंमत 1 टक्क्यांनी वाढली आणि पाच आठवड्यातील घसरणीनंतर पहिल्यांदाच पहिल्या साप्ताहिक वाढीच्या दिशेने कूच करत आहे. अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा कमी रोजगारविषयक आकडेवारीमुळे फेड रिझर्व्ह व्याज दरवाढ पुढे ढकलण्याची अपेक्षा वाढली, ज्यामुळे गुंतवणूकदारन्स जोखीम घेण्याची ताकद वाढली.
या दरम्यान, डॉलर निर्देशांकही आठवड्याभरात सुमारे अर्ध्या टक्क्याने घसरला, त्यामुळे इतर चलनांत सोने स्वस्त झाले. याशिवाय भू-राजकीय आघाडीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत, मात्र वादाचा मुख्य मुद्दा (अणुशस्त्रे) यावर अद्यापही तोडगा निघलेला नाही.
सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच
गुंतवणूकदारांनी पैसे काढायला सुरुवात केली परिणामी, जून महिन्याच्या अखेरीस दरांमध्ये घसरण झाली. जानेवारी महिन्याच्या अखेरीस उच्चांकी शिखरावर उंच झेप घेतलेल्या सोन्याच्या दरात जून तिमाहीत 12% हून अधिक घसरण झाली, आणि याच काळात चांदीचा भावही 17 टक्क्यांनी घसरला. अशाप्रारे, देशांतर्गत बाजारात जानेवारीमध्ये 1.90 लाख रुपयांवर उच्चांकी झेप घेतलेल्या सोन्याचा भाव 1.39 लाख रुपयांपर्यंत घसरलेला.
(Disclaimer : सोने आणि चांदीमधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. तुम्हाला कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करायची असल्यास सर्वप्रथम आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा