Rent vs Buying House in Mumbai : अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने मुंबईतील आपल्या मालकीचे आलिशान अपार्टमेंट 5.51 लाख रुपये दरमहा भाड्यावर दिल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर अगदी कोट्यवधींची मालमत्ता असणारे लोकही मुंबईत घर खरेदी करण्याऐवजी भाड्याने राहणे का पसंत करतात? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. मोठे गुंतवणूकदार आणि मोठी संपत्ती असलेल्या व्यक्तींना या प्रश्नाचे उत्तर चांगलेच ठाऊक असेल.

करोडपती लोकही भाड्याने का राहतात?
कोट्याधीश, मोठ्या व्यावसायिक, चित्रपट अभिनेते-अभिनेत्री, आणि उच्च संपत्ती असलेले लोक सर्वसामान्य लोकांप्रमाणे घर खरेदी करत नाही. अशा लोकांसाठी घर केवळ राहायची जागा नाही तर, एक आर्थिक मालमत्ता असते. इतर गुंतवणुकींमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा एकाच मालमत्तेत लाखो रुपये गुंतवणे अधिक चांगले असे त्यांना वाटते, म्हणूनच दर महिन्याला लाखो रुपये भाडे देण्यास सहज तयार होतात.
घरात गुंतवण्यासाठी नव्हे, पैशातून पैसा कमावण्यासाठी असतो पैसा
उदाहणार्थ समजा मुंबईतील एका पॉश भागात आलिशान अपार्टमेंटची किंमत 35 कोटी रुपये आहे. म्हणजे कोणतीही व्यक्ती इतक्या मोठ्या किमतीचे घर किंवा अपार्टमेंट घेतले तर, त्याच्या भांडवलाचा मोठा भाग एकाच मालमत्तेत अडकून राहतो.
दुसरीकडे, तेच 35 कोटी रुपये व्यवसाय, शेअर मार्केट, खासगी इक्विटी, स्टार्टअप किंवा 12 ते 15 टक्के परतावा देऊ शकणाऱ्या इतर गुंतवणूक पर्यायात गुंतवले तर, वर्षला करोडोंची कमाई होऊ शकते. अशा परिस्थितीत, 60 ते 70 लाख रुपये भाडे देणे त्यांना जास्त परवडते.
भाड्याच्या हिशोबातही घर खरेदी फायद्याचे नाही
आपल्या देशातील प्रमुख शहरे किंवा महानगरांमध्ये आलिशान घरे भाड्याने देऊन 2 ते 4 टक्के उत्पन्न मिळते. म्हणजे 30 कोटींच्या घरातून वर्षाला 60 लाख ते 1 कोटी रुपये भाडे मिळू शकते, जे घराच्या एकूण किमतीपेक्षा खूप जास्त आहे. म्हणून पैशांनी समृद्ध लोकांना बऱ्याच लोकांना घर विकत घेण्याऐवजी भाड्याने राहणे अधिक फायदेशीर वाटते.
कॅश-फ्लो मजबूत राहतो
व्यावसायिकांसाठी पैशांचा फ्लो सुरू राहणं महत्त्वाचं असतं. घरात कोट्यवधी रुपये गुंतवल्यास गरजेच्या वेळी विड्रॉ काढणे कठीण होऊ शकते. पण, तेच पैसे गुंतवले तर त्याचा नवीन व्यवसाय, गुंतवणूक किंवा इतर कोणत्याही संधीसाठी त्वरित वापर होऊ शकतो. त्यामुळे, अनेक श्रीमंत व्यक्ती आपले भांडवल चलनात ठेवण्यास प्राधान्य देतात.
लगेचच घर बदलणे शक्य होते
मोठे व्यावसायिक, सीईओ आणि चित्रपट तारे-तारका अनेकदा वेगवेगळ्या शहरे आणि प्रदेशांमध्ये काम करतात. आज मुंबईतील वांद्रे येथे स्थायिक असले तरी, काही वर्षांनी जुहू, दिल्ली, दुबई किंवा लंडनमध्ये राहायाला जावे लागू शकते. म्हणून घर भाड्याने घेतल्याने त्यांना कोट्यवधी रुपयांची मालमत्ता विकण्याची चिंता न करता सहज स्थलांतर करण्याचे स्वतंत्र मिळते. समुद्रकिनारी असलेले अपार्टमेंट, प्रीमियम टॉवर्स, खाजगी क्लब, स्विमिंग पूल, जिम, उच्च सुरक्षा आणि इतर आलिशान सुविधा असलेले घर खरेदी करण्यासाठी अनेकदा 50 कोटी ते 10 कोटींचा खर्च करावा लागू शकतो. पण या सुविधा खूप कमी किमतीत भाड्याने मिळू शकतात त्यामुळे, अनेक लोक मालकी हक्कापेक्षा भाड्याने राहायला प्राधान्य देतात.
देखभालीचा कमी भार
महागडं घर घेतलं तर, मालकाला अनेकदा मालमत्ता कर, मोठी दुरुस्ती, संरचनात्मक देखभाल आणि इतर खर्च करावे लागतात. याउलट घर भाड्याने घेतल्यास घरमालक अनेकदा खर्चाचा मोठा भाग उचलतो, ज्यामुळे भाडेकरूचा त्रास कमी होतो.
प्रत्येकासाठी ही रणनीती योग्य नाही
भरीव भांडवल असलेलं अशाच लोकांसाठी ही रणनीती फायदेशीर आहे, सर्वांसाठी नाही. सर्वसामान्य लोकांसाठी घर घेणं आर्थिक सुरक्षा, स्थिरता आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे घर भाड्याने घ्यायचे की विकत घ्यायचे हा निर्णय व्यक्तीचे उत्पन्न, गुंतवणुकीची क्षमता आणि गरजा यावर अवलंबून असतो.

