Headlines

Tukaram Munde यांची दूध उत्पादक, विक्रेत्यांना वॉर्निंग! दूध खरेदीबाबत नागरिकांनाही केलं जागरुक – fda commissioner tukaram mundhe on strict action to be taken against adulterating milk


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#tukarammundhe #fda #milkadulterationहॉटेल्सवर कारवाईचा बडगा एकीकडे सुरु असतानाच आता दूध विक्रेते आणि उत्पादक तुकाराम मुंढेंच्या रडारवर आले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडले आहेत. हॉटेल व्यावसायिक, पनीर विक्रेते आणि बेकरी चालकांवर धडक कारवाई केल्यानंतर आता तुकाराम मुंढेंचा मोर्चा थेट राज्यातील ‘दूध सम्राटां’कडे वळला आहे. राज्यात दुधातील वाढती भेसळ आणि नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक सेव्ह फूड सेव्ह ड्रग मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दुधाच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीसाठी अत्यंत कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. ग्राहकांसाठी दूध, दुग्धजन्य पदार्थ पोहोचण्यापर्यंतची निर्बंध स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. या सविस्तर एक्सप्लेनरच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षणात कोणत्या गंभीर त्रुटी आढळल्या आहेत, दूध व्यावसायिकांना कोणते नियम पाळावे लागणार आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांनी दूध खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत