Headlines

Sangli News: सांगलीत शेतकऱ्यांचं थेट विद्युत टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन; आटपाडी तालुक्यात खळबळ!


सांगली – सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे खाजगी कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या विद्युत टॉवरला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. टॉवर उभारणीमुळे डाळिंब आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकरी थेट टॉवरवर चढले.

कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले असून, नुकसानभरपाई न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, योग्य नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय टॉवर उभारणीचे काम सुरू होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत