Pune-Nashik Semi-High-Speed Railway: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याप्रश्नी भेट घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग बदलून तो शिर्डीमार्गे वळविण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या मार्गाला नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही तीव्र विरोध केला आहे. मंत्री विखे-पाटील यांच्या उपस्थितीत विधिमंडळात पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात पुणे-नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच गेली पाहिजे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून लावून धरण्यात आली.
Nashik News : वारीने जीवदान दिले अन् व्यसन सुटले! महिला वारकरी सुमनबाईंची डोळ्यांत पाणी आणणारी भावना, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीच्या दिशेने
अन्य रेल्वेमार्गांबाबत सकारात्मक
हा रेल्वे प्रकल्प पूर्वनियोजित सरळ मार्गाने पूर्ण झाला तरच त्याचा मूळ उद्देश साध्य होईल, हा मुद्दाही बैठकीत ठामपणे मांडण्यात आला. यासोबतच नाशिक-शिर्डी आणि अहिल्यानगर-पुणे या रेल्वेलाही आमचा अजिबात विरोध नसून, उलट हे प्रकल्पही व्हावेत यासाठीही ठामपणे सोबत असल्याचा विश्वास पुन्हा एकदा या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी दिला. मात्र, आमच्या हक्काची सरळ मार्गावरील रेल्वे रद्द करून ती शिर्डी-अहिल्यानगरमार्गे वळवली जाऊ नये, ही स्पष्ट भूमिकाही यावेळी अधोरेखित करण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, ॲड. माणिकराव कोकाटे, माजी खासदार शिवाजीराव पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, प्राजक्त तनपुरे, बाबाजीशेठ काळे, शरद सोनवणे, अमोल खताळ, अक्षय कर्डिले आदी उपस्थित होते.
Amol Kolhe : अमोल कोल्हे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, ऑफरबाबतही मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार शिष्टमंडळ
शेतकरी, विद्यार्थी, युवक, उद्योजक आणि उत्तर महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील जनतेचे व्यापक जनहित लक्षात घेऊन हे सर्व प्रकल्प या बैठकीच्या माध्यमातून मार्गी लागतील आणि सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. पूर्वनियोजित सरळ मार्ग क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. हा प्रकल्प मार्गी लागेपर्यंत कोणीही मागे हटणार नाही, असा निर्धारही करण्यात आला.

