Navi Mumbai Pregnant Woman Death: राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भासह मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रिचा मिश्रा आणि सोनम डोंगरे या दोन गर्भवतींना ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. दोघीही आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याने अर्भकाच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार आवश्यक इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर दोघींनाही अस्वस्थ वाटू लागले.
Navi Mumbai News : जलमय हायवेवरुन चालताना विजेचा धक्का, दोन कॉलेज तरुणी बेशुद्ध, रिक्षाचालक प्रवीण महाले ठरले देवदूत, फांदीची ट्रिक उपयुक्त
१ जुलै रोजी त्यांना वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सोनम डोंगरे या महिलेचा गर्भासह मृत्यू झाला. रिचा मिश्रा हिला पुढील उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इंजेक्शनच्या गुणवत्तेची व संपूर्ण उपचार प्रक्रियेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी वाशी सार्वजनिक रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.
Apollo Hospital : जीवघेण्या ‘पॉलीट्रॉमा’वर मात; नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्स अन् कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश, मर्चंट ऑफिसरला जीवनदान
विशेष चौकशी समिती
या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जे. जे. रुग्णालयाचे विभाग प्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ सोसायटीचे सदस्य, तसेच महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे .

