![]()
राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्य आणि नेत्यांच्या पक्षांतरावर शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना बच्चू कडू यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर थेट आणि अत्यंत शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटावर आज जी बिकट वेळ आली आहे, त्याला केवळ राऊतच जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला. ‘सचिन आले, आता त्यांची क्रिकेट टीमही येणार’ सचिन अहिर यांनी नुकताच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी खास आपल्या शैलीत टोलेबाजी केली. ते म्हणाले, “सध्या फक्त सचिन आले आहेत, लवकरच त्यांची संपूर्ण क्रिकेट टीमही इकडे (शिंदे गटात) येणार आहे.” या विधानातून त्यांनी ठाकरे गटातील आणखी काही मोठे नेते आणि आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. संजय राऊतांवर थेट निशाणा; ‘फक्त मारायचं राहिलंय’ संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करताना कडू यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. “संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी खूप झापलं आहे, आता फक्त त्यांना मारायचं तेवढं बाकी राहिलंय,” असे विधान त्यांनी केले. तसेच, शिवसेनेवर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज जी काही परिस्थिती ओढवली आहे, ती सर्वस्वी केवळ संजय राऊत यांच्यामुळेच आली असल्याचा दावाही बच्चू कडू यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ‘ऑपरेशन टायगर’ सुसाट; पावसासोबत आमचाही जोर वाढणार! शिंदे गटाकडून राबवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ बद्दल विचारले असता, बच्चू कडू यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. “जसा आता पावसाचा जोर वाढत चालला आहे, तसाच आता आमचाही जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसांत पक्षात आणखी मोठी ‘इन्कमिंग’ झालेली पाहायला मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात ठाकरे गटाला आणखी धक्के बसणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हेही वाचा.. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला!:’ऑफर’च्या विधानामागची ‘ही’ होती! इनसाइड स्टोरी; खासदार अमोल कोल्हेंचा पत्रकार परिषदेत खुलासा पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भातील वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या जोरदार चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पडदा टाकला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कालच्या “ऑफर आली तर भविष्यात विचार करेन” या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे सांगत संपूर्ण प्रसंग स्पष्ट केला. “आदरणीय शरद पवार साहेब सांगतील तेच आमचे धोरण आहे,” असे सांगत त्यांनी आपण पक्षातच राहणार असल्याचे पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केले. सविस्तर वाचा
Source link
सचिन आलेत, आता त्यांची क्रिकेट टीमही येणार:ऑपरेशन टायगरवर बच्चू कडूंचा दावा, संजय राऊतांवरही जोरदार हल्लाबोल
