New Alto K10 Kerb Weight: मारुती सुझुकीने प्रोडक्शन सुरू केल्यापासून, आतापर्यंत अल्टोमध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. विशेषतः अल्टोने कर्ब वेटमध्ये मोठा बदल केला आहे.

मारुती सुझुकीने प्रोडक्शन सुरू केल्यापासून, आतापर्यंत अल्टोमध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. विशेषतः अल्टोने कर्ब वेटमध्ये मोठा बदल केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी आपल्या 10th जनरेशन अल्टोचे वजन 100 किलोने कमी करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही कार 2026 मध्ये लाँच करु शकते.
नवीन जनरेशन Alto चे किती असणार वजन?
मारुती सुझुकीने 1st जनरेशन अल्टो लाँच केली तेव्हा त्याचे वजन 545 किलो होते. आता कंपनीकडे अल्टोची 9th जनरेशन आहे, ज्याचे वजन 680 किलो आहे. मिळलेल्या माहितीनुसार नवीन जनरेशन अल्टोचे वजन 580 असू शकते. कंपनी कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कम्पोनेंटमध्ये हलके मटेरिअल वापरू शकते. वजन कमी झाल्यामुळे, नवीन अल्टो चांगले मायलेज देईल व सोबतच किंमतही कमी होईल.
नवीन अपडेटसह लाँच झाली Alto K10
कंपनीने मारुती अल्टो के10 मध्ये मोठे अपडेट्स केले आहेत. यापूर्वी या कारमध्ये फक्त फ्रंट ड्युअल एअरबॅग्ज उपलब्ध होत्या. पण आता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. यासोबतच, कारमध्ये रिअर पार्किंग सेन्सर्स, मागे बसणाऱ्यांसाठी रिअर सीट बेल्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी प्रोग्रॅम कार्यक्रम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि अँटी ब्रेक-फोर्स डिस्ट्रीब्यूशन यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
जपानी वाहन उत्पादकांनी या कारमध्ये कोणतेही Mechinal बदल केलेले नाहीत. मारुती अल्टोमध्ये 998 सीसीचे K10C पेट्रोल इंजिन आहे. कारमधील हे इंजिन 5500 आरपीएम वर 49 किलोवॅट पॉवर आणि 3500 आरपीएम वर 89 एनएम टॉर्क जनरेट करते. कारच्या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. मारुती कारमध्ये 27 लिटर कॅपेसीटीची फ्यूल टँक आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

