Welcome To The Jungle Box Office Collection : अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमानं भरघोस कमाई केली असून हा सिनेमा लवकरच ‘राजा शिवाजी’लाही मागे टाकणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अहमद खान दिग्दर्शित ‘ वेलकम टू द जंगल ‘ हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. या अॅक्शन-अॅडव्हेंचर कॉमेडीला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आठवड्याच्या दिवसांमध्येही सिनेमानं मोठ्या संख्येनं कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या पाच दिवसांतच ‘वेलकम टू द जंगल’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
‘वेलकम टू द जंगल’नं पाच दिवसांत जगभरात किती कमाई केली?
‘वेलकम टू द जंगल’ने प्रदर्शनाच्या पाच दिवसांतच, या चित्रपटानं देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर मोठी कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘वेलकम टू द जंगल’नं पाचव्या दिवशी १०,६१६ शोमधून ९.२५ कोटी कमाई केली. यामुळे चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई ८१.५० कोटींवर पोहोचली आहे, तर त्याची भारतातील एकूण कमाई ९७.१७ कोटी आहे. परदेशात, चित्रपटानं पाचव्या दिवशी ३.०० कोटी कमावले असून एकूण परदेशी कमाई २२.९५ कोटी झाली आहे. यामुळे, चित्रपटाची पाच दिवसांची जगभरातील कमाई १२०.१२ कोटींवर पोहोचली आहे.
Gaurav Malankar : इंटर्नशिपला गेल्यावर २ महिन्यांतच केलेले कंपनीचे मोठे नुकसान, गौरवचा मजेशीर किस्सा
जगभरातील २५ चित्रपटांच्या एकूण कमाईला मागे टाकून, ‘वेलकम टू द जंगल’नं या वर्षातील २५ चित्रपटांच्या एकूण कमाईला मागे टाकलं आहे. या सिनेमानं राम चरणच्या ‘पेड्डी’ (हिंदी) (२६.२५ कोटी), वरुण धवनच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ (८७.७८ कोटी) आणि आयुष्मान खुरानाच्या ‘पती पत्नी और वो दो’ (७७.८१ कोटी) यांनाही मागे टाकलंय. आता अक्षय कुमारचा सिनेमा लवकरच ‘राजा शिवाजी’लाही मागे टाकणार आहे. Mandar Jadhav : चार-पाच वर्ष काम नाही, डिप्रेशनमुळे वाईट विचार, पण नाही मानली हार; मंदार जाधवनं सांगितला कठीण काळ
जगभरातील या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट:
‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट २६ जून २०२६ रोजी प्रदर्शित झाला. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रविना टंडन, लारा दत्ता, फरिदा जलाल, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, तुषार कपूर आणि राजपाल यादव यांसारखे कलाकार आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा