Headlines

आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच हरवले, राजस्थानच्या खेळाडूनेच केला खरा गेम, कोण आहे जय मुंद्रा?


Jai Moondra News : भारताचा आयर्लंड संघाने पहिल्यांदाच पराभव करत इतिहास रचला. या सामन्यामध्ये मूळ राजस्थानचा असलेल्या भारतीय वंशाच्या जय कुंद्रा याने आयर्लंड संघाकडून पदार्पण केले. या सामन्यात जय याने भारताला बॅकफूटला ढकलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नेमका कोण आहे जय कुंद्रा जाणून घ्या.

Jay Moondra
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि आयर्लंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पाहुण्या भारतीय संघाला पराभूत करत यजमानांनी ३४ धावांनी विजय मिळवला. आतापर्यंत आयर्लंड संघाने एकदाही भारताला पराभूत केले नव्हते, पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयसच्या नावावर हा नकोस विक्रम झाला. पहिल्यांदा बॅटिंग करताना आयर्लंडने १८२-९ धावा केल्या होत्या, मात्र भारतीय संघ १४८ धावांवर ऑल आऊट झाला. या सामन्यात आयर्लंड संघाकडून भारतीय वंशाच्या खेळाडूने पदार्पण केले होते. ज्याने सामना फिरवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण पठ्ठ्याने पहिल्या बॉलवर पहिली विकेट घेतली. त्यासोबतच सामन्यात महत्त्वाच्या वेळी भारताच्या मॅचविनरला त्याने आऊट केले. विशेष म्हणजे त्याचाही तो पहिलाच सामना होता, राजस्थानच्या अंडर १४ संघाचा भाग राहिला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

डावखुरा गोलंदाज जय मुंद्रा याने आपल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या बॉलवर विकेट मिळवल. भारताचा स्टार खेळाडू संजू सॅमसन याला ५ धावांवर त्याने आऊट केले. आयर्लंड संघाकडून टी-२० मध्ये पदार्पण करताना पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी ३ वर्षांपूर्वी ही कामगिरी मॅथ्यू हम्फरीज याने बांगलादेशविरूद्ध २०२३ मध्ये केली होती.
Maharashtra TimesIND vs IRE : ‘मला विश्वासच बसत नाहीये भारताने वैभवला खेळवलं नाही’; माजी कर्णधाराचं गंभीर-श्रेयसकडे बोट
राजस्थानमधील टोंक येथे १० जानेवारी १९९७ मध्य जय मुंद्रा याचा जन्म झाला होता. राजस्थानच्या अंडर १४ मधून त्याने अनेक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा खेळल्या आहेत. जय याने एमटेकचे शिक्षण घेण्यासाठी आयर्लंडला गेला होता. तिथे गेल्यावर तो स्वत:ला क्रिकेट खेळण्यापासून रोखू शकला नाही. डब्लिनमधील प्रसिद्ध ‘लेनस्टर क्रिकेट क्लब’मध्ये खेळायला सुरुवात केली. २०२३ मध्ये ‘आयरिश सीनियर कप’ जिंकलेल्या संघाचा तोही सदस्य होता.
Maharashtra TimesIND vs IRE : आयर्लंडकडून वर्ल्ड कप विनर भारताचा इतिहासात पहिल्यांदाच पराभव, 2 खेळाडूंनी फिरवली संपूर्ण मॅच
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये जय याने संजू सॅमसन आणि शिवम दुबे याची विकेट घेतली. ४ ओव्हरमध्ये २५ धावा देत २ विकेट नावावर केल्या. शिवम दुबेची एकदम मोक्याच्या वेळी विकेट घेत त्याने भारताला विजयापासून दूर नेले. कारण शिवम सेट व्हायला लागला होता त्यामुळे आयर्लंडसाठी त्याची विकेट महत्त्वाची होती, ती विकेट जयने मिळवून देत सामना खेचला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा