Gaurav Khanna Reaction On Divorce With Akanksha Chamola ; Gaurav Khanna Akanksha Chamola : आकांक्षा म्हणते आम्ही वेगळे झालोय तर गौरव म्हणतो माझं अजूनही तिच्यावर प्रेम, ती माझी पत्नी; सेलिब्रिटी घटस्फोटाने नेटकरी चक्रावले
Gaurav Khanna Reaction On Divorce With Akanksha Chamola ; Gaurav Khanna Akanksha Chamola : आकांक्षा म्हणते आम्ही वेगळे झालोय तर गौरव म्हणतो माझं अजूनही तिच्यावर प्रेम, ती माझी पत्नी; सेलिब्रिटी घटस्फोटाने नेटकरी चक्रावले
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस 19 विजेता गौरव खन्ना सध्या त्याची पत्नी आकांक्षासोबत होत असलेल्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी सध्या नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप २’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या शोदरम्यान तिने गौरवसोबतच्या घटस्फोटाबाबत मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. आता गौरव खन्नाने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
‘लॉक अप 2’ हा रिअॅलिटी शो सध्या नेटफ्लिक्सवर पाहायला मिळत आहे. अगदी पहिल्याच एपिसोडमध्ये, गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोला हिने घटस्फोटाचा उल्लेख करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. आकांक्षाने हे देखील सांगितले की, हे जोडपे गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत आहे.
आकांक्षा चमोला सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती ‘लॉक अप सीझन 2 चा भाग आहे. घटस्फोटाच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर, गौरव खन्नाने 30 जून रोजी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
त्यानंतर, एका पापाराझीने म्हटले की, “पण भाई, यावरून बराच वाद निर्माण झाला आहे.” यावर गौरव म्हणाला, “मी आकांक्षाला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. ती चांगली कामगिरी करेल आणि विजयी होईल, अशी मला आशा आहे. मी कधीही माघार घेणार नाही; मी तिला पाठिंबा देणे असेच सुरूच ठेवेन.”
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
गौरवने घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच मौन सोडले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यावर युजर्सकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने “GK इज द बेस्ट” असे लिहिले, तर दुसऱ्याने त्याच्या डोळ्यांत दिसणाऱ्या भावनांचे कौतुक केले. काही लोक त्याला ट्रोलही करत आहेत.
दरम्यान, आकांक्षाचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. श्रिया कालरा आणि सुफी मोतीवाला यांच्याशी झालेल्या संभाषणात ती असे म्हणताना दिसत आहे की, तिला कधीच आई होण्याची इच्छा नव्हती. गौरवने सुरुवातीला हे मान्य केले होते, पण आता त्याला मुले हवी आहेत. मात्र, माझ्या स्वभावाला किंवा जीवनशैलीला ही गोष्ट अजिबात साजेशी नाही.त्यामुळेच त्यांचा घटस्फोट होत आहे.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा