Headlines

Sunil Lahri : ‘वाईट कृत्य, भक्तांच्या श्रद्धेचा मोठा विश्वासघात’, अयोध्या राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर संतापले ‘रामायण’ फेम ‘लक्ष्मण’


Sunil Lahri : अभिनेते सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अयोध्या राम मंदिरातील देणगीच्या घोटाळ्यावर भाष्य केलं असून संताप व्यक्त केला आहे.

Sunil Lahri On Ram Mandir Donation Scam
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या देणगीच्या घोटाळ्यावर कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील लाहरी यांनी राम मंदिर प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही घटना अत्यंत वाईट असल्याचं म्हटलं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सुनील लहरी यांची पोस्ट

सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून या संपूर्ण घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, ‘नमस्कार मित्रांनो, जय श्री राम… ४००-५०० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि हजारो लोकांच्या बलिदानानंतर अयोध्येत राम मंदिर बांधलं गेलं. रामलल्लाची प्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात पार पडली. संपूर्ण देशानं त्या भावना अनुभवल्या.’
Maharashtra TimesNakul Ghanekar : ‘मी खूप बारीक होतो, लोक मला चिडवायचे म्हणून कथ्थक शिकणं सोडलेलं’, ‘ठरलं तर मग’ फेम नकुल घाणेकरनं सांगितला किस्सा
‘त्या मंदिरातून कोट्यवधी रुपये चोरले गेले. किती वाईट कृत्य आहे. याबद्दलची कधी कल्पनाच करू शकत नाही. भक्तांच्या भावना आणि श्रद्धेचा हा केवढा गंभीर विश्वासघात आहे. मी कायदा आणि सरकारला आवाहन करतो की, जो कोणी यासाठी दोषी आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे किंवा सौदी अरेबियासारख्या इतर देशांमध्ये चोरीसाठी जशी शिक्षा दिली जाते तशी शिक्षा आरोपीला दिली पाहिजे. हा इतरांसाठी एक धडा ठरावा आणि कोणीही अशी चोरी करण्याचं धाडस करणार नाही याची खात्री व्हावी.’ असं सुनील यांनी म्हटलंय.
सुनील लहरी यांनी व्हिडिओ शेअर करत, ‘रामजींनी सीतेला सांगितलं होतं की, असं कलियुग येईल, जिथे माझी सेवा करणारेच माझा विश्वासघात करतील’ असं कॅप्शन लिहिलं असून ‘अयोध्या मंदिरातील चोरीतील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.’ असं म्हटलं आहे.
Maharashtra TimesZeenat Aman : 15 वर्षांच्या दुःखी वैवाहिक आयुष्यापेक्षा 5 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिलेलं चांगलं; नव्या पिढीला झीनत अमान यांचा सल्ला
दरम्यान, राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा आरोप समोर आल्यानंतर, राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं. या एसआयटीमध्ये लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत, लखनौ झोनचे पोलीस महानिरीक्षक किरण एस. आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नीलरतन यांचा समावेश आहे. तपास पूर्ण केल्यानंतर, एसआयटीनं आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. मात्र, सरकारने स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणाचा तपास सुरू असून, आवश्यकतेनुसार पुढील तपास आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाईल.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा