Home Buyers Relief: देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घर खरेदीदारांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. घर खरेदीदारांच्या बाजूने निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतरही फ्लॅट मिळण्यास होणाऱ्या विलंबासाठी खरेदीदार बिल्डरकडून नुकसान भरपाईचा दावा केला जाऊ शकतो.

न्यायालयाने म्हटले आहे की, ताबा मिळाल्यानंतर घर खरेदीदारांचा तक्रार करण्याचा अधिकार संपत नाही. ताबा मिळाल्यानंतरही सेवांमध्ये विलंब किंवा कमतरता असल्यास घर खरेदीदार तक्रार करू शकतो.
Bank Holidays July 2026: जुलैमध्ये 12 दिवस बँकांचे कामकाज बंद पडणार; सुट्ट्यांची यादीच पाहूनच कामाचे प्लॅनिंग करा
घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात पुढे म्हटले आहे की, विकासकांनी ताबा देण्यास विलंब केला, तर घर खरेदीदार ग्राहक मंचात जाऊन नुकसान भरपाईचा दावा करू शकतात. या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग – NCDRC – चा जुना निर्णयही रद्द केला ज्यामध्ये म्हटले होते की एकदा खरेदीदाराला ताबा मिळाल्यानंतर विलंबाबद्दल तक्रार करू शकत नाही किंवा नुकसान भरपाई मागू शकत नाही. तसेच खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील कोणताही करार खरेदीदाराचे हक्क आणि हितसंबंध मर्यादित करू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने पुढे सांगितले.
याशिवाय खरेदीदाराची तक्रार फ्लॅटचा ताबा मिळवण्याच्या उद्देशाने नसून विलंबामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी असल्याचेही न्यायालयाने सांगितले. त्यामुळे ताबा मिळाल्यानंतरही भरपाईचा दावा केला जाऊ शकतो.
Stock Market Crash: भावांचा विषय लय हार्ड! दोघांनी नोकऱ्या बदलल्या अन् अनेक देशांचे शेअर बाजार हादरले; ‘ते’ नेमके कोण?
22 वर्षांनी मिळाला घराचा ताबा
सर्वोच्च न्यायालयाने एका घर खरेदीदाराच्या प्रकरणात हा निकाल दिला, जिथे बिल्डरने तब्बल 22 वर्षांनंतर फ्लॅटचा ताबा दिला होता. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि व्ही. महना यांच्या खंडपीठाने घर खरेदीदाराच्या बाजूने निकाल दिला आणि ‘ताबा मिळाल्यानंतरही विलंबाबद्दल तक्रार करण्याचा व नुकसान भरपाई मागण्याचा हक्क’ दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, ताबा मिळाल्यानंतर होणाऱ्या विलंबाबद्दल खरेदीदाराला तक्रार करण्यास मनाई करणारा NCDRC चा नियम ग्राहक हितामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.
8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या हालचाली अंतिम टप्प्यात; पगारवाढीत सरकारच अडसर ठरणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे संकेत
बिल्डरकडून ताबा मिळण्यास विलंब होत असेल तर काय करावे?
पुरावे गोळा करा: ताबा देण्याच्या ठरलेल्या तारखेचा उल्लेख असलेल्या कराराची प्रत जपून ठेवा.
तक्रार दाखल करा: राज्य RERA प्राधिकरण किंवा ग्राहक न्यायालयात तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
वकिलाचा सल्ला घ्या: करारामध्ये लवादाचे कलम असले तरी, ग्राहकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार कायम राहतो.

