Headlines

आता ठरलं! भारताच्या महिला टीममध्ये मोठा बदल होणार, कोच अमोल मुझुमदार यांनी सगळा प्लॅन सांगून टाकला


Amol Muzumdar News : महिला भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कपमधून साखळी गटातच बाहेर पडला होता. एकवेळ अशी होती की भारताला विजेतेपदाचा दावेदार मानलं जात होतं. मात्र साखळी फेरीतच भारत गारद झाला. याच पार्श्नभूमीवर बोलताना अमोल मुझुमदार यांनी मोठे विधान केले आहे.

Womens Team India
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आता सुरू असलेल्या टी-२०वर्ल्ड कप मधून भारतीय संघ साखळी फेरीमधूनच बाहेर पडला. भारतीय गोलंदाजी कुठेतरी कमी पडलेली दिसली. मात्र आता भारतीय संघ कात टाकण्याच्या तयारीत दिसत आहे. भारतीय महिला संघाचे कोच अमोल मुझुमदार यांनी मोठे विधान केले आहे. ‘भारतीय संघाला टी-२० क्रिकेटमधील आपल्या रणनीतीचा फेरविचार करावा लागणार आहे,’ अशी कबुली भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी दिली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर आम्ही कमी पडलो, हेदेखील त्यांनी मान्य केले. त्याचवेळी त्यांनी मला दीड वर्षे द्या, आपल्या गोलंदाजांची कामगिरी सुधारून दाखवतो, असेही त्यांनी सांगितले.

वर्ल्ड कप महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताचे आव्हान साखळीतच आटोपले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारतास खराब गोलंदाजीचा फटका बसला. ‘आम्हाला टी-२० रणनीतीचा, खेळाचा खरोखरच फेरविचार करावा लागेल. आपण कोणत्या संयोजनासह खेळणार आहोत, यावर आम्हाला गंभीरपणे विचारमंथन करावे लागेल,’ असे मुझुमदार यांनी नमूद केले. पाच साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघाने वेगवान गोलंदाजांमध्ये बदल केले. त्याचाही फटका भारताला बसला.
Maharashtra TimesSuryakumar Yadav : आयर्लंडकडून भारत हरला, सूर्याने जखमेवर मीठ चोळलं? पोस्टनं टायमिंग साधलंच अन् तुफान प्रतिसादही मिळाला
‘या संपूर्ण स्पर्धेतील काही ठरावीक गोष्टींवर बोट ठेवायचे झाले, तर मला वाटते की आम्हाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे लागेल. याचबरोबर फलंदाजीही जास्त आक्रमक करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता आमचे गोलंदाज अननुभवी आहेत. मी मागील पत्रकार परिषदेतही सांगितले होते की, आम्हाला १८ महिन्यांचा वेळ द्या, हे गोलंदाजी आक्रमण तुम्हाला पूर्णपणे वेगळे आणि प्रगल्भ दिसेल,’ असेही त्यांनी नमूद केले.
Maharashtra TimesWPL मध्ये हवा, मग देशासाठी खेळताना फेल का? वर्ल्डकपमधील ५ मोठ्या चुका सांगत अंजुम चोप्रांनी कोणावर फोडलं खापर?
स्पर्धेत भारतीय फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नव्हते. ‘पॉवरप्लेमध्ये धावगती उंचावण्यास वाव होता. प्रत्येक वेळी सामना हरल्यानंतर तुम्हाला अजून १०-१५ धावा केल्या असत्या तर… असे वाटत राहते. पॉवरप्लेमध्ये नक्कीच आम्ही जास्त धावा केल्या नव्हत्या, पण विकेटही गमावल्या नव्हत्या. त्यामुळे आमचे वर्चस्व होते. त्याचा फायदा घ्यायला हवा होता. निम्मी षटके झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्याही तीन फलंदाज बाद झाल्या होत्या, हे आपण लक्षात घ्यायला हवे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा