Headlines

Nanded Kandhar Arjun Jadhav Success Story on Get Extra Audio Story App; हलाखीच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या लेकानं बनवलं ‘Get Extra’ ऑडिओ स्टोरी ॲप; लहान मुलांच्या बुद्धीमतेला चालना


Nanded Arjun Jadhav Startup App : नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील 24 वर्षीय तरुणाने आपल्या संकल्पनेतून एक ॲप तयार केलं आहे. हे ॲप लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे.

Nanded Arjun Jadhav Startup App
अर्जुन जाधव गेट एक्स्ट्रा ऑडिओ स्टोरी ॲप(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : प्रतिकूल परिस्थितीतही जगण्यासाठी आणि काहीतरी नवीन करण्यासाठी नवा मार्ग शोधता येतो. हेच साध्य करुन दाखवलंय नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने. अवघ्या 24व्या वर्षात त्याने लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी ‘Get Extra.In’ नावाचे अभिनव ऑडिओ स्टोरी ॲप तयार केलं आहे. हे ॲप फायदेशीर ठरत असून मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी मदत देखील होत आहे. अर्जुन आप्पाराव जाधव असं तरुणाचं नाव आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वबळावर उभं केलेलं हे ‘स्टार्टअप’ आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

दहावीपासून ब्लॉगिंगची प्रचंड आवड

अर्जुन जाधव हा नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नंदनशिवणी या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील आप्पाराव जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. हलाकीच्या परिस्थितीचा सामना करत आप्पाराव यांनी लेकरांना शिकवलं. मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. अर्जुन याचं प्राथमिक शिक्षण हे गावात झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने पुणे गाठलं आणि बी.सी.एचचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणासोबतच स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्याने सुरक्षारक्षक म्हणून काम देखील केलं. अर्जुनला दहावीपासून ब्लॉगिंगची प्रचंड आवड होती, त्यातच युट्युबच्या माध्यमातून तांत्रिक माहिती घेऊन त्याने स्वतःचे ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटच्या युगात काहीतरी नवीन करण्याचं त्याचं स्वप्न देखील होतं, हेच स्वप्न साकार करण्यासाठी त्याने ‘Get Extra.In’ नावाचं अभिनव ऑडिओ स्टोरी ॲप तयार केलं. त्याला मित्रांची साथ देखील मिळाली. जवळपास त्याला 50 हजार रुपये गुंतवणूक करावी लागली. सुदैवाने त्याच्या या प्रयत्नाला यश देखील मिळालं आणि जून 2025 मध्ये हे ॲप प्ले-स्टोअरवर लाँच झाल्याचं अर्जुन जाधव याने सांगितलं.
Maharashtra TimesMumbai Food Poisoning Case : कलिंगडातून विषबाधा अशक्यप्राय, डॉक्टरांचं मत; चौघांच्या मूत्रपिंडावर गंभीर परिणाम, कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ वाढलं

अल्बर्ट आईन्स्टाईनच्या विचारांतून मिळाली प्रेरणा

कोरोना काळात शिक्षणासाठी धडपडत असताना अर्जुन जाधव याने एकदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या विचारांवर आधारित ऑडिओ स्टोरी ऐकत होता. त्यांच्या विचारावरील आधारित ऑडियो स्टोरीतून त्याला नवीन दिशा मिळाली. डिजिटल युगातही मुलांच्या कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती वाढवण्यासाठी एक नविन ॲप तयार करण्याची कल्पना सुचली आणि हे ॲप विकसित केलं.

काय आहे ‘Get Extra.In’ ॲप

‘Get Extra.In’ ॲप हे एक लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवणारं ॲप आहे. जून 2025 मध्ये प्ले-स्टोअरवर लाँच झालेल्या या ॲपमध्ये मुलांसाठी 1000 हून अधिक ऑडिओ स्टोरीज उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने: इतिहास, संतांची माहिती, वैज्ञानिक कथा, वैदिक स्टोरीज यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध असल्याचं अर्जुन याने सांगितलं. या स्टोरीजचा मुख्य उद्देश मुलांची क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन आणि बुद्धिमत्ता वाढवणं असल्याचं त्याने सांगितलं. अवघ्या काही काळातच या ॲपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1500 हून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं असून, 40 हून अधिक पालकांनी सशुल्क नोंदणी केली आहे. केवळ 49 रुपये प्रतिमहिना अशा माफक दरात ही सेवा उपलब्ध असून, त्यातून अर्जुनला महिन्याला 3 ते 4 हजारांचं उत्पन्नही सुरू झालं आहे.
Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : सोमवार ठरला ‘ब्लॅक मंडे’; भीषण अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा

मुलांसाठी ॲप ठरत आहे फायदेशीर

सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रणामात होत आहे. मुलासह अबाल वृद्धही मोबाईलचा वापर करत असतात. प्रत्येक घरी दोन ते तीन स्मार्टफोन झाले आहेत, त्यामुळे पालकही आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी अपयशी ठरत आहेत. अनेकवेळा असं घडतं मुलं फोनवर जेव्हा युट्युब किंवा इंस्टाग्राम पाहत असताना भरपूर वेळा अभद्र व्हिडिओ अचानक समोर येतात. त्याचा मुलांवरही वाईट परिणाम पडतो. परंतु या ॲपच्या माध्यमातून मुलांच्या बुद्धिमत्तेला चांगली चालना मिळेल, असा विश्वास अर्जुनला आहे. ‘भविष्यात हे ॲप जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे’, असं अर्जुन जाधव याने सांगितलं. एका छोट्या गावातील मुलाने तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वबळावर उभं केलेलं हे ‘स्टार्टअप’ आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आणि लहान मुलांसाठी फायदेशीर ठरत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा