Headlines

Vijaya Mehta passes away :


Vijaya Mehta passes away : मराठी रंगभूमीसाठी एक दु:खद अशी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं निधन झालं आहे.

Vijaya Mehta passes away
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ आपल्या अद्वितीय दिग्दर्शनानं आणि शिस्तीनं गाजवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता (विजयाबाई) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयाबाईंनी राहत्या घरी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला.

विजया मेहता यांच्या निधनानं भारतीय प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील एक मार्गदर्शक आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं असून, संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आणि शिस्तीने गाजवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शिका विजया मेहता (विजयाबाई) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्यानं भारतीय प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील एक मार्गदर्शक आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं असून, संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

Maharashtra TimesRuchita Jadhav: महाबळेश्वर, कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये १०० हून अधिक बंगले, मराठी अभिनेत्री कोट्यवधींचीं मालकीण, सांगितलं बिझनेस मॉडेल
नाट्यक्षेत्रातील एका पर्वाचा अस्त
४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा इथं जन्मलेल्या विजया मेहता (पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत) यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मधून नाट्यशास्त्राचे रीतसर शिक्षण घेतलं होतं. प्रख्यात नाट्य प्रशिक्षक इब्राहिम अल्काझी यांच्या त्या पट्टशिष्या होत्या. नाट्यवर्तुळात त्या ‘बाई’ या नावाने अत्यंत आदराने ओळखल्या जात.

१९६० च्या दशकात त्यांनी नाटककार विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत ‘रंगायन’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेनं मराठीत प्रायोगिक रंगभूमीची एक मोठी चळवळ उभी केली आणि मराठी नाटकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
Maharashtra TimesDivya Suresh : लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार, रस्त्यावरील माणसानं केलं आक्षेपार्ह कृत्य; सांगितली आपबिती
रंगभूमीच्या ‘बाईं’ची एक्झीट
विजयाबाई या केवळ दिग्दर्शिका नव्हत्या, तर त्या उत्तम अभिनय गुरू होत्या. त्यांच्या शिस्तीच्या मुशीतून आणि मार्गदर्शनाखाली नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, भारती आचरेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार घडले. ‘बॅरिस्टर’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘मुधराक्षस’, ‘सखाराम बाईंडर’ यांसारखी त्यांची अनेक नाटकं मराठी रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली.

चित्रपट आणि इतर योगदान

नाटकांसोबतच त्यांनी चित्रपट माध्यमातही मोलाचं योगदान दिलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘पेस्तनजी’ आणि ‘रावसाहेब’ हे हिंदी चित्रपट कमालीचे गाजले. तसंच गोविंद निहलानी यांच्या ‘पार्टी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि ‘स्मृतिचित्रे’ ही मराठी टेलिफिल्म आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘झिम्मा’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रचंड वाचकप्रिय ठरले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

कलाविश्वातून श्रद्धांजली

विजयाबाईंच्या निधनाचे वृत्त समजताच नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आणि दिग्गजांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “मराठी रंगभूमीला आधुनिक आणि प्रगतीशील विचार देणाऱ्या, आम्हाला बोट धरून चालायला शिकवणाऱ्या आमच्या ‘बाई’ गेल्या, ही न भरून निघणारी हानी आहे,” अशा शब्दांत अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा