Headlines

231 nigerian citizens arrested in nalasopara drugs worth crores seized ; नायजेरियन नागरिकांची धरपकड; नालासोपाऱ्यात 231 जण ताब्यात, कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त


Nalasopara Nigerian Crackdown: नालासोपाऱ्यात काही इमारतींमध्ये नायजेरियन नागरिकांनी ब्युटी पार्लर, कपड्यांची दुकाने, चायनीज, किराणा, सलून आणि बार सुरू केले होते. यावर महापालिकेने कारवाई केली.

nalasopara crime
nalasopara crime(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, वसई: नालासोपाऱ्यात राहणाऱ्या बेकायदारीत्या नायजेरियन नागरिकांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. बुधवारी सकाळी प्रगतीनगर, रेहमतनगर आणि मोरेगाव परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवून २३१ नायजेरियन नागरिकांची धरपकड करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये पोलिसांना एका व्यक्तीकडे अमली पदार्थदेखील आढळून आले. बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन व्यक्तींना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येणार आहे.

वसई-विरारमध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन आणि इतर परकीय नागरिकांचे वास्तव्य आहे. वसई, मिरा रोड येथे स्वस्त दरात सदनिका उपलब्ध होत असल्याने या भागात त्यांचा ओघ वाढत आहे. याशिवाय छुप्या पद्धतीनेही परदेशी, मुख्यतः नायजेरियन नागरिक वास्तव्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातील अनेक नागरिक अमली पदार्थांच्या तस्करीत आणि लॉटरी फसवणुकीच्या गुन्ह्यांत सापडल्याचे विविध पोलिस ठाण्यांतील दाखल गुन्ह्यांवरून दिसून येते.

Maharashtra TimesPalghar News: भीषण वास्तव! रस्त्याअभावी 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; झोळी बांधून दवाखान्यात नेताना वाटेतच सोडला जीव
बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन तसेच इतर परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी यापूर्वीही कारवाई केली होती. मात्र तरीही अनेकांचे व्हिसा संपल्यानंतरही ते बेकायदा राहत असल्याने उपद्रव कमी होत नव्हता. नुकताच रस्त्यावर सर्रास अमली पदार्थ विक्री करतानाचा नायजेरियन नागरिकांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत प्रगतीनगर, रेहमतनगर आणि मोरेगाव येथून २३१ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.

दुकानांवर कारवाई

शहराच्या पूर्वेकडील तुळींज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही इमारतींमध्ये नायजेरिया, घाना, युगांडा येथील नागरिकांनी बेकायदा थाटलेल्या सुमारे ४० दुकानांवर पोलिस व वसई-विरार महापालिकेने संयुक्त कारवाई केली.

Maharashtra TimesBullet Train Update: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण, कधी धावणार पहिली ट्रेन?
काय सापडले कारवाईत?

पोलिसांच्या या कारवाईत २३१ नायजेरियन नागरिकांची धरपकड करण्यात आली. यामध्ये ११५ पुरुष, ९८ महिला आणि १८ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील एका व्यक्तीकडून सुमारे दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे बुधवारी नालासोपारा परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होता. ही कारवाई पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज, आचोळे, वालीव, नायगाव, माणिकपूर आणि वसई या सहा पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबवली.

Maharashtra TimesBMC Mayor: महापौरांसाठी 35 लाखांची कार! प्रमुख नेत्यांनाही अलिशान गाड्या, BMCकडून कोट्यवधींचा खर्च
तुळींज परिसरात नायजेरियन आणि इतर परदेशी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. त्यांच्या उपद्रवामुळे वसई-विरारमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ही धरपकड मोहीम राबवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. – पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा