Headlines

Gold Rate Crash Today 30 June 2026; सोन्याचा ‘बबल’ फुटला! पिवळसर गोल्डच्या किंमतींनी शिखर गाठल्यानंतर 18 वर्षांचा विक्रम मोडला, गुंतवणूकदारांची धडधड वाढली


Gold Price Fall June 2026: मंगळवार, 30 जून रोजी, सोन्याच्या किमतीत 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यासह जागतिक बाजारात सोन्याची किंमत ऑक्टोबर 2008 नंतरच्या सर्वात मोठ्या मासिक घसरणीच्या दिशेने कूच करत आहे. मजबूत डॉलर आणि अमेरिकेत व्याजदर वाढीच्या अपेक्षेमुळे सोन्यावर दबाव आला असताना गुंतवणूकदार या आठवड्यात अमेरिकेच्या रोजगारविषयक आकडेवारीवर गुंतवणूकदारांचे लक्ष लागून असेल.

Gold Price Crash Today 30 June 2026
सोन्याचा ‘बबल’ फुटला! पिवळसर गोल्डच्या किंमतींनी शिखर गाठल्यानंतर 18 वर्षांचा विक्रम मोडला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Gold Rate Crash Today: अख्ख्या जून महिन्यातील सोन्याच्या दरातील घसरणीने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. पश्चिम आशियात अमेरिका-इराण-इस्रायल यांच्या तणावामुळे महागाईचा पुन्हा भडका उडण्याची चिंता वाढली असून या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्ह – व्याजदर वाढण्याची शक्यता दिसत आहे, ज्याचे पडसाद सोने आणि चांदीच्या किमतींवर होताना पाहायला मिळत आहेत.

सोन्यात 18 वर्षांतील सर्वात मोठी घसरण

मंगळवार, 30 जून रोजी, MCX वरील सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याची किंमत 1800 रुपयांनी घसरली, तर चांदीची किंमत 2.21 लाखांच्या आसपास व्यवहार करत आहे. अशाप्रकारे, पिवळसर सोन्याची किंमत ऑक्टोबर 2008 नंतरच्या सर्वात मोठ्या मासिक घसरणीच्या दिशेने कूच करत आहेत. सध्या मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 140130 रुपये तर, 22 कॅरेट सोने 128500रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 105100 रुपये आहे.
Maharashtra TimesEthanol Petrol: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग केवळ चाचपणीसाठी, पुढच्या वर्षी अहवाल येतील! सरकारी वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार?

पश्चिम आशियातील अनिश्चितता कमी झाली आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेत व्याजदर वाढण्याच्या अपेक्षेमुळे अख्ख्या जून महिन्यात सोन्यावर दबाव कायम राहिला. तसेच मजबूत डॉलर आणि अमेरिकेतील व्याजदर वाढण्याच्या अपेक्षांनी सोन्यावरील दबावात लक्षणीय वाढ झाली. या दरम्यान, आता गुंतवणूकदार या आठवड्यात अमेरिकेच्या रोजगारविषयक आकडेवारीवर लक्ष ठेवून असतील जिथून फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील धोरणाबद्दल संकेत मिळतील.

सोन्याच्या किमतीत मोठी घट अपेक्षित

2024 नंतर प्रथमच सोन्याच्या दरात विक्रमी तिमाही घसरणीची शक्यात बळावली आहे, जी जून 2013 च्या तिमाहीनंतर सर्वात मोठी तिमाही घसरण असू शकते. इराण युद्धादरम्यान ऊर्जा किमतींमध्ये मोठी वाढ झाली, ज्यामुळे वाढत्या महागाईबद्दल चिंता वाढली आणि व्याजदर वाढीची अपेक्षा निर्माण झाली.
Maharashtra TimesShare Market : ये रे ये रे पैसा… 1 लाखाचे झाले 3.40 लाख; एथर एनर्जीच्या गुंतवणूकदारांना सहा महिन्यातच सुपरडुपर फायदा!
फेडरल रिझर्व्हच्या हालचालींकडे नजर
सीएमई फेडवॉच टूलनुसार, फेडरल रिझर्व्ह यावर्षी तीनदा व्याजदर वाढ करू शकते. सप्टेंबरमध्ये सुमारे 64% दरवाढीची शक्यता असल्याचा अंदाज असून गुंतवणूकदार आता जूनच्या ADP रोजगार डेटा आणि नॉनफार्म पेरोल डेटावर लक्ष बारीक लक्ष ठेवून असतील. या आकडेवारीवरून फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील धोरणाबद्दल संकेत मिळू शकतात.
Maharashtra TimesProperty Rights: नातेवाईकांची परवानगी न घेता Joint प्रॉपर्टी विकू शकतो का? वडिलोपार्जित मालमत्ता कशी विकायची? जाणून घ्या नियम

मजबूत डॉलर, तेलही घसरले

दुसरीकडे, अमेरिकी डॉलरही बळावला असून सलग दुसऱ्या महिन्यात वाढीच्या दिशेने वाटचाल करत आहे, परिणामी इतर चलनात सोने खरेदी महाग झाली. या दरम्यान, तेलाच्या किमती 2020 नंतरच्या सर्वात मोठ्या तिमाही घसरणीच्या दिशेने कूच करताना दिसत आहे. इराणने अशी कोणतीही बैठक नियोजित नसल्याचे म्हटले तरीही या आठवड्यात दोहा येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य चर्चेच्या परिणामावरही गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवून असतील.

(Disclaimer : सोन्या-चांदीमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या भरवशाच्या आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा