Headlines

ketan agarwal asked his father about siya and chetan affair uncle narendra mittal; लग्नाआधी केतनने वडिलांना तीनदा तोच प्रश्न विचारला; उत्तरावर ठेवला विश्वास, पुढे भयंकर घडलं


Ketan Agarwal death case: केतन अगरवाल प्रकरणाची सध्या देशात चर्चा आहे. सोनम रघुवंशी प्रकरणासारख्याच या घटनेनेही सध्या सर्वत्र खळबळ उडालेली आहे. सध्या या प्रकरणातील नव्या माहितीनुसार केतनने लग्नापूर्वी त्याच्या नियोजित पत्नी सियाची सर्व माहिती विचारली होती. तिचे कोणाशी अफेअर आहे का ही बाबही केतनने तपासण्याचे सांगितले होते, त्यामागचे कारणही चेतनच होता.

ketan asked his father about siya and chetan affair
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. साखरपुड्यानंतरच केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल बाबत संशय येऊ लागला होता. इतकंच नाही, तर त्याने वडील विशाल अग्रवाल यांना तब्बल तीन वेळा एकच प्रश्न विचारला होता ‘सियाचा बॅकग्राऊंड नीट तपासला होता ना?’ मात्र प्रत्येक वेळी त्याला विश्वास देण्यात आला आणि अखेर त्यानेही तोच शब्द खरा मानला. एफआयआरमध्ये नोंदवलेल्या विशाल अग्रवाल यांच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, सिया गोयल आणि अग्रवाल कुटुंबामधील ओळख नरेंद्र मित्तल यांच्या माध्यमातून झाली होती. मित्तल यांनीच सियाचे स्थळ आणत ती त्यांच्या नातेवाईकांतील मुलगी असल्याचे सांगितले होते.

नातेसंबंधामुळे संशय दूर झाला

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मित्तल यांची बहीण प्रवीण गोयल यांच्याशी विवाहबद्ध आहे. त्यामुळे ते सियाचे मामा, तर विशाल अग्रवाल यांचे चुलत भाऊ असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये त्यांना ‘अंकल’ म्हणून संबोधले जात होते. या नातेसंबंधामुळे अग्रवाल कुटुंबाने या स्थळावर कोणताही संशय घेतला नाही. त्यानंतर सिया आणि केतन यांचा साखरपुडा पुण्यातील बंड गार्डन परिसरात पार पडला.

Maharashtra TimesPune Crime : सिया-चेतनने पार ‘दृश्यम’ सारखं डोकं लावलं, पण पोलिसांनीही चेकमेट केलंच, केसमधील निर्णायक पुरावा जप्त

केतनने वारंवार व्यक्त केला संशय

साखरपुड्यानंतर काही दिवसांनी केतनने प्रथमच वडिलांना सियाच्या पार्श्वभूमीबाबत विचारणा केली. त्यावेळी नरेंद्र मित्तल यांनी सर्व माहिती पडताळून पाहिल्याचे सांगत त्याची समजूत काढण्यात आली. यानंतर प्री-वेडिंग शूटसाठी इंडोनेशियाला जाण्याची तयारी सुरू असताना केतनचा पासपोर्ट हरवला. त्यानंतर त्याने पुन्हा सियाबाबत शंका व्यक्त केली. सिया किरकोळ कारणांवरून वारंवार वाद घालत असल्याचेही त्याने वडिलांना सांगितले. मात्र, पुन्हा एकदा त्याला सर्व काही व्यवस्थित असल्याचा विश्वास देण्यात आला.

चेतन चौधरीच्या नावामुळे वाढला संशय

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, लोहगड किल्ल्यावरून परतल्यानंतर केतनने तिसऱ्यांदा वडिलांकडे आपली शंका व्यक्त केली. त्याने सांगितले की, सियाला फोन केला की तिचा मोबाईल अनेकदा व्यस्त असायचा. इतकेच नव्हे, तर ती सतत चेतन चौधरीचा उल्लेख करत असल्याने त्याला संशय येऊ लागला होता.

‘सियाचं दुसऱ्या कोणासोबत अफेअर आहे का?’ असा थेट प्रश्नही केतनने वडिलांना विचारल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मात्र, विशाल अग्रवाल यांनी पुन्हा नरेंद्र मित्तल यांच्या ओळखीचा दाखला देत सियाची पार्श्वभूमी पूर्णपणे पडताळली असल्याचे सांगितले. त्यानंतर केतननेही वडिलांच्या शब्दावर विश्वास ठेवला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा