Pune Murder Case Wife Killed Husband After Watching Crime Web Series; पुणे हत्याकांडात धक्कादायक माहिती: क्राइम वेबसीरीज पाहून पतीचा खून, क्रूरपणाची हद्द पार करत…
Pune Murder Case Wife Killed Husband After Watching Crime Web Series; पुणे हत्याकांडात धक्कादायक माहिती: क्राइम वेबसीरीज पाहून पतीचा खून, क्रूरपणाची हद्द पार करत…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. क्राइम वेबसीरिज पाहून हा खून केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी पत्नी, अल्पवयीन मुलगी आणि तिचा प्रियकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका आठवड्याच्या आत ग्रामीण पोलिसांना जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात यश आले आहे.
जॉन्सन कॅजिटन लोबो (वय ४९, रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अग्नेल जॉय कसबे (वय २३, रा. साईकृपा सोसायटी, वडगाव शेरी), सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३, गुडविल वृंदावन सोसायटी, वडगाव शेरी) आणि एका अल्पवयीन मुलीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
अग्नेल याचे आरोपी सॅन्ड्रा हिच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध आहेत. मुलीचे वडील जॉन्सन यांचा प्रेमसंबधाला विरोध होता. या कारणावरून पती-पत्नीत वादावादी व्हायची. भांडणाला वैतागून आरोपी महिला आणि तिच्या मुलीने जॉन्सन यांचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी समाजमाध्यमातील वेगवेगळ्या गुन्हेगारीविषयक मालिका पाहिल्या. ३० मे रोजी मध्यरात्री जॉन्सन घरात झोपले होते. आरोपींनी त्यांच्या डोक्यात वरवंटा घालून मानेवर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर एक दिवस त्यांनी मृतदेह घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी मृतदेह कारमधून नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरातील मोकळ्या जागेत पेट्रोल टाकून जाळून टाकला.
तपासात ‘सीसीटीव्हीं’ची मदत
सणसवाडी परिसरात गुरुवारी (१ जून) जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासले. तेव्हा एक कार संशयास्पदरीत्या दिसून आली. पोलिसांच्या पथकाने २३० ‘सीसीटीव्हीं’चे चित्रीकरण तपासून कारचा शोध घेतला. घटनेच्या दिवशी कार आरोपी अग्नेल चालवत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर खुनाला वाचा फुटली.
दरम्यान, जॉन्सन यांचा खून झाल्याचे कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी पत्नी सॅन्ड्रा हिने जॉन्सनचा मोबाइल सुरू ठेवला होता. ती पतीच्या मोबाइलमधील स्टेटस रोज बदलायची. तिचा रविवारी (४ जून) वाढदिवस होता. तिने पतीच्या मोबाइलवर वाढदिवसाचे स्टेटस ठेवले. मात्र, पोलिसांनीही कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, जितेंद्र पानसरे, जनार्दन शेळके, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, किशोर शिवणकर, चंद्रकांत काळे, सचिन होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा