Buldhana married woman death 20 year old rohini ends life after enduring family abuse; पतीकडून त्रास, 20 वर्षीय रोहिणीने आयुष्याचा दोर कापला; दीड वर्षीय चिमुकला मातृप्रेमाला मुकला
Buldhana married woman death 20 year old rohini ends life after enduring family abuse; पतीकडून त्रास, 20 वर्षीय रोहिणीने आयुष्याचा दोर कापला; दीड वर्षीय चिमुकला मातृप्रेमाला मुकला
बुलढाणा: हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून पतीसह सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून एका 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत तरुणीचा पती, सासू, सासरा आणि दीर अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी प्रवीण म्हस्के असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून पती प्रवीण म्हस्के, सासरे ब्रह्मानंद आनंदा म्हस्के, सासू विमल ब्रह्मानंद म्हस्के आणि दीर प्रदीप ब्रह्मानंद म्हस्के यांनी ‘हुंडा कमी दिला’ या कारणावरून रोहिणीचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. त्यानंतर पतीसाठी व्यवसायाकरिता चारचाकी वाहन घेण्यासाठी आणखी एक लाख रुपये आणण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.
दरम्यान, समेट घडवून आणण्याच्या उद्देशाने मुलीच्या माहेरच्यांनी एकदा दहा हजार रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही पैशांसाठी त्रास सुरूच होता. २ मार्च २०२६ रोजी सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून रोहिणीने आत्महत्या केली. या प्रकरणी तालुक्यातील बोराखेडी बुद्रुक येथील रहिवासी परमेश्वर बाबासाहेब मोरे (वय ४२ वर्षे) यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे आणि बीट जमादार रविराज चव्हाण करत आहेत.
दीड वर्षाचा विश्वराजचे मातृछत्र हरवले!
आई रोहिणीने आत्महत्या केल्याने दीड वर्षाचा विश्वराज मातृप्रेमाला मुकला आहे. पोलिसांनी सासरच्या लोकांना ताब्यात घेतले आहे. घरात कोणी नसल्याने दीड वर्षाच्या मुलाचा सांभाळ कुणी करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणात दीड वर्षाच्या चिमुकल्याला सोडून जी माता निघून गेली आहे त्यामागे आता या चिमुकल्याचं होणार तरी कसं, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा