Jalna Maratha Reservation Manoj Jarange and Prasad Lad Meeting : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तलवार उपसली आहे. 30 मेपासून आमरण उपोषण सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहेत, आणि यावर सध्या दोघांमध्ये चर्चा सुरु आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले?
‘एक आमदार, नेता म्हणून नाही तर सर्वसामान्य म्हणून भेटीला आलोय. मनोज जरांगे हे समाजाचं दैवत आहेत. त्यांनी आवाहन केलं म्हणून एक दिवस आधीच आलो. माझ्याविषयी तुमच्या मनात द्वेष असेल तर ते मला दूर करायचे आहेत. समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत. दादांच्या सात-आठ मागण्या मी समजून घेणार आहे. मागण्या का मान्य झाल्या नाहीत? त्या अडचणी समजून घेणार आहे. समाजाच्या अडचणी दूर झाल्या नाहीत, तर आमदारकीचा राजीनामा देणार. समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत. मनोज जरांगेंचे विषय मी सरकार दरबारी मांडणार’, असंही लाड यावेळी म्हणाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत सवाल केला असता ते म्हणाले की, ‘हाकेसाहेबांना जरांगेंच्या मागण्यांवर पोटशूळ उठण्याचं कारण नाही. हाकेंनी मागण्यांबाबत गैरसमज करु नये. हाकेंनी चर्चेला बोलावलं तर त्यांच्याकडेही जाईल’, असं म्हणत प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं.
Chandrapur Tiger Attack : तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला, चौघींचा जागीच अंत, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता महाराष्ट्रातील मोठी घटना
धमकीचे फोन अनेक वर्षे येतात
आज सकाळी प्रसाद लाड यांच्या पीएच्या फोनवर एक धमकीचा फोन आला होता. त्याबाबत प्रश्न केला विचारला असता ते म्हणाले की, ‘मला धमकीचे फोन अनेकवर्षे येतात. मी त्यावर लक्ष देत नाही. काल रामा इंटरनॅशनलमध्ये काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला. धमकी देणारे मराठा समाजातले कार्यकर्ते असल्याचं समजलं. मी समाजासाठी दादांच्या आवाहनावर इथे आलोय, धमक्या कशाला? आणि तसं असेल तर मी समाजासाठी मरायला तयार आहे’, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
जरांगेंनी उपोषण करु नये…
‘मी युद्ध पेटवायला आलेलो नाहीय, गीतेतला सार घेऊन आलोय. दादांचा हात माझ्या डोक्यावर राहिला तर समाजाचे प्रश्न तडीस जातील. मी आणि जरांगे भाऊ, आमच्यात भांडणं लावू नका. दादांसाठी मी विविध मुद्द्यांचे कागदही घेऊन आलोय. विकास महामंडळाला काल दीडशे कोटींचा निधी मिळाला, अभिनंदन करायला हवं. दादांनी यापुढे उपोषण करु नये मी माझी विनंती आहे. 30 मे या दिवशी जरांगेंनी उपोषण आंदोलन करु नये’, अशी मागणी प्रसाद लाड यांनी यावेळी केलीय.
Bandra Terminus Metro: ‘मेट्रो-११’चा वडाळा ते वांद्रे विस्तार; गरीब नगर येथील अतिक्रमणमुक्तीनंतर हालचाली, भुयारी मेट्रोने प्रवास वेगवान होणार
मनोज जरांगे काय म्हणाले?
‘सारथी अंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या का कमी केली? 80 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती का थांबवली? मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू नाहीय. आमच्या आईला मारलं तर आम्ही त्यांच्या आईवर का बोलू नये?’, असे सवाल जरांगेंनी लाड यांना विचारले. पुढे ते म्हणाले की, ‘रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाणीही दिलं नाही. फडणवीस म्हणाले माझे पोलीस आहेत, मग जनता तुमची नाही? अंतरवालीत आमच्यावर अन्याय का केला? आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याबाबत वाईट बोललो होतो का? मालकत्व, पालकत्व स्वीकारायचं असेल तर टीकाही सहन करायला हवी. मराठ्यांनी तुमचं काय पाप केलंय? मुख्यमंत्री आमच्या जातीचा नसूनही आरक्षण दिलं, कुणी नाकारलं?’, असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार मनोज जरांगेंनी यावेळी केला आहे. आता या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील उपोषणाबाबत काय निर्णय घेतात, यावर सर्वाचं लक्ष लागून आहे.

