Headlines

CM Devendra Fadnavis Appreciate Ganesh Nibe Work For Defense Sector in Shirdi Program


संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद वाढली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम देशाच्या संरक्षण क्षेत्रात होत आहे. विशेष म्हणजे शिर्डीत क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली.

Devendra fadnavis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : युद्ध हे कोणत्याही देशाला परवाडणारं अजिबात नाही. युद्ध देशाला प्रगतीकडे नाही तर मागे खेचतं. युद्धामुळे देशाची आर्थिक हानी होतेच, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरावर हानी होते. त्यामुळे युद्धापेक्षा शांततेत मार्ग काढण्याचा पर्याय नेहमीच चांगला मानला जातो. पण तरीही स्वसंरक्षणासाठी आपण सज्ज राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याकडे अपेक्षित दारुगोळा असणं आवश्यक आहे. भारतात दारुगोळ्याचा अमाप साठा आहे. विशेष म्हणजे भारताने संरक्षण क्षेत्रात इतकी प्रगती केली की, भारत आता इतर देशांमध्ये शस्त्रास्त्र निर्यात करतो. इतकंच नाही सीमेवर वर्षभर युद्ध सुरु राहीलं तरी तितका दारुगोळा तयार करण्याचं सामर्थ्यदेखील भारताने मिळवलं आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिर्डीत क्षेपणास्त्र संकुल, तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीस बोलत होते.

“आजचा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दोन संदेश दिले होते. पहिला म्हणजे मेक इन इंडिया आणि दुसरा होता, आत्मनिर्भर भारत. स्वत:करताही भारत बनवेल आणि जगाकरतादेखील भारत बनवेल, असा संदेश मोदींनी दिला होता. मोदींच्या नेतृत्वात संरक्षण क्षेत्रात हा संदेश अंमलात आणण्याची जबाबदारी आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वीकारली. आज आपण पाहतोय, जो देश सगळी शस्त्रास्त्रे आयात करत होता, आयातीत गोष्टींच्या भरोशावर लढत होता, आज तोच देश मोठ्या प्रमाणात संरक्षण क्षेत्रातला निर्यातदार बनला आहे. आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आता जगातील चांगल्यात चांगले ड्रोन, मिसाईल हे आपण आपल्याकडे तयार करत आहोत. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.ॉ

संरक्षण क्षेत्रात देशाची क्षमता वाढल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

“मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की, आपल्या महाराष्ट्रातला एक युवक, ज्यांचं नाव गणेश निबे आहे, त्यांनी या डिफेन्स क्षेत्रात ज्याप्रकारे आपलं काम उभं केलं, महाराष्ट्राकरता आणि देशाकरता हे अत्यंत गौरवास्पद आहे. मी गेले अनेक वर्ष त्यांना पाहतोय. तंत्रज्ञान हा त्यांचा आवडता विषय आहे. वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आणायचं, ते आपल्या देशात तयार करायचं, त्याचे प्रोडक्ट्स तयार करायचे आणि आज या ठिकाणी ही फॅसिलीटी तयार झाली याचा आनंद वाटतो. त्यांनी आज वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र तयार केले. आपल्याकडे 70 किमी ते 400 ते 500 किमीच्या रेंजपर्यंत मध्ये कुठलंही अस्त्र नव्हतं. त्यामध्ये मोठा गॅप होता. पण दीडशे आणि तीनशे किमीपर्यंत मारा करु शकेल असं अस्त्र तयार करण्याचं काम निबे यांनी केलं. त्यामुळे आपल्या देशाची कॅपॅबिलीटी वाढली”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

360 दिवस पुरेल इतका दारुगोळा

“निबे मगाशी राजनाथ सिंह यांना सांगत होते की, 360 दिवस लगातार आपल्याला युद्ध करावे लागले आणि सीमेवर दारुगोळा लागला तर तो सगळा दारुगोळा तयार करण्याची क्षमता आज त्यांनी तयार केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम झालेलं आहे. आपल्याला आश्चर्यचकीत करु शकतील असं काम इथे होत आहे. यापूर्वीदेखील आम्हाला उद्घाटनाला जाण्याचं भाग्य मिळालं. त्याने केलेलं कार्य हे थक्क करणारं कार्य पहायला मिळतं. आपल्या देशाकरता आणि देशाच्या सुरक्षेकरता आज अत्यंत मोठं कार्य झालं आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

“आपल्या देशातून वेगवेगळ्या देशांना शस्त्रास्त्र निर्यात होणार आहे. आताच काही करार झाले. इस्त्रायल सोबत करार झाला आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सी प्लेनची गरज आहे. हे सी प्लेन तयार करण्याची क्षमता निबे यांनी तयार केली आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी देखील आत्मनिर्भर भारताचे एक मोठं उदाहरण बघायला मिळालं. भारतीय सैन्याने जे काम करुन दाखवलं ते पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकीत होतं”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा