Latur MPSC Exam Student Amit Sonkamble ends life asks Mother to donate books in Last Note Crime News; आई, माझ्या मृत्यूनंतर पुस्तकं गरीब मुलांना दे; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, महाराष्ट्र हळहळला
Latur MPSC Exam Student Amit Sonkamble ends life asks Mother to donate books in Last Note Crime News; आई, माझ्या मृत्यूनंतर पुस्तकं गरीब मुलांना दे; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, महाराष्ट्र हळहळला
Latur Student ends life : चार वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा लातूर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे, मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला यश मिळेलच असे नाही. काही जण यातून चांगला मार्ग काढत आयुष्याला वेगळी दिशा देतात, काही जण मात्र परिस्थितीसमोर गुडघे टेकतात. गेल्या चार वर्षापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा लातूर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने अशाच प्रकारे टोकाचं पाऊल उचललं आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी पुस्तकं गरजू विद्यार्थ्यांना द्या, त्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील, असंही त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे.
काय घडलं नेमकं?
आई, मला या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मी आता आत्महत्या करत आहे, असे म्हणत तरुणाने राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमित उत्तम सोनकांबळे (वय २७, रा. शेळगाव, ता. चाकूर, जि. लातूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. Sahil Dhaneshra : रील शूट करताना धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अल्पवयीन आरोपी दहावीच्या परीक्षेसाठी जामिनावर, हतबल आई रडत म्हणाली… आई-पप्पा, तुम्हाला सोडून जाऊ वाटत नाही. परंतु गेल्या चार वर्षांपासून तुमच्यापासून वेगळे राहण्याचा वैताग आला आहे, असा मजकूर लिहीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अमितने स्वतःच्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१६) सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आमदार Sunil Shelke यांचा भाजप मंत्री बाळा हेगडेंवर पैसे लाटल्याचा आरोप
त्यात आई-पप्पा, तुम्हाला सोडून जावे वाटत नाही. परंतु, अलिप्त राहण्याचा वैताग आला आहे. माझी पुस्तके गरीब विद्यार्थ्यांना द्या, त्यांना अभ्यासाला उपयोगी पडतील, अशी भावनिक चिठ्ठी लिहून अमित सोनकांबळे याने त्याचे जीवन संपविले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा