Headlines

State Government Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 Three Lakh Farmers are Waiting; शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कोंडी? कर्जमुक्त तीन लाख खातेदारांची माहिती सादर, पण अंमलबजावणीचे आव्हान; ‘ओटीएस’बाबत संभ्रम


Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 : विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील पर्यटनाला अधिक चालना देणारा १५ कोटी रुपयांचा ‘एकात्मिक पर्यटन सर्किट’ प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बैतूल जिल्ह्यातील कुकरू येथे याबाबत अधिकृत घोषणा केली. या सर्किटअंतर्गत महाराष्ट्रातील चिखलदरा, मेळघाट, मुक्तागिरी आणि मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील कुकरू ही चार प्रमुख पर्यटनस्थळे एकमेकांशी जोडली जाणार असून, यामुळे संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.

Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चे शासकीय गणित कागदावर अत्यंत चोख मांडण्यात आले आहे. मात्र, खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी प्रत्यक्ष लाभाची प्रतीक्षा संपलेली नाही.

तीन लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत

जिल्ह्यातील १२ प्रमुख बँकांमधील एकूण तीन लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत आले असून, यामध्ये २ लाख २ हजार थकीत कर्जदार आणि ९३ हजार नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत. या सर्वांची मिळून तब्बल २ हजार ८६२ कोटी रुपयांची अधिकृत आकडेवारी प्रशासनाने तयार केली असली, तरी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित असल्याने महाआयटीच्या संथ पोर्टलमुळे ऐन पेरणीच्या दिवसांत ही मदत शेतकऱ्यांच्या हातात पडणार का, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Maharashtra TimesSachin Ahir : अरुण गवळींचा भाचा, मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी उत्सवासाठी ओळखलं जाणारं नाव; ठाकरेंना धक्का देणारे सचिन अहिर कोण आहेत?

२ लाख २ हजार १६७ पात्र थकबाकीदार शेतकरी

प्रशासनाने जाहीर केलेल्या २ लाख २ हजार १६७ पात्र थकबाकीदार शेतकरी खात्यांसाठी सुमारे २३३८ कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली आहे. यात नेहमीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक ७१,६५५ लाभार्थी असून ७०० कोटींची रक्कम अडकली आहे. त्याखालोखाल स्टेट बँकेचे ४१.१३५ शेतकरी (५१३ कोटी) आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे २९.९८० शेतकरी (४८८ कोटी) लाभार्थी आहेत. इतर प्रमुख बँकांमध्ये सेंट्रल बँक ( २९.०१० शेतकरी- २९८ कोटी), बँक ऑफ इंडिया (७.७८३ शेतकर – ८० कोटी), इंडियन बँक (७.२४७ शेतकरी- ८२ कोटी), युनियन बँक (६.१७०शेतकरी- ७६ कोटी), बँक ऑफ बडोदा ( ३.१०२ शेतकरी – ४७ कोटी), महाराष्ट्र ग्रामीण बँक ( २, ०८३ शेतकरी – २९ कोटी), पंजाब नॅशनल बँक ( २,१८२ शेतकरी – ८ कोटी), कॅनरा बँक ( १,९०२ शेतकरी – ९ कोटी) आणि युको बँकेच्या ५७८ शेतकऱ्यांच्या ५ कोटी रुपयांचा समावेश आहे.

नियमित कर्जदारांना ५२४ कोटींचे प्रोत्साहन

वित्तीय शिस्त पाळणाऱ्या आणि वेळेत ५० हजारांपर्यंतचे प्रोत्साहनपर लाभ घेणाऱ्या ९३,१३९शेतकरी खात्यांसाठी ५२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातही जिल्हा बँकेचे सर्वाधिक ४८,८६९ शेतकरी (२४४ कोटी) पात्र ठरले आहेत. तर स्टेट बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, इंडियन बँक, ग्रामीण बँक, युको बँक आणि कॅनरा बँक मिळून एकूण ४३,७७९ शेतकर्यांऱ्या खात्यात २८० कोटी रुपये जमा केले जाणार आहे.
Maharashtra TimesSachin Ahir : ठाकरेंचे विश्वासू, विधान परिषदेवर संधी, तरी शिवबंधन का सोडलं? सचिन अहिरांच्या धक्कादायक निर्णयामागील कारण समोर

‘ओटीएस’बाबत संभ्रम

वन टाइम सेटलमेंट अर्थात ओटीएस योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शेतकरी आधी स्वत:चा हिस्सा कसा भरणार आणि यावर शासनाने बँकांशी समन्वय साधून काही तोडगा काढला आहे का, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. ग्रामीण भागातील सर्व्हर डाऊन आणि भारनियमनाचा गोंधळ यंत्रणा कशी टाळणार, असा प्रश्रही विचारला जातोय.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा