संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी केलेला दावा खरं आहे ते सांगावं, असं आव्हान संजयकाका पाटील यांनी केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतं जयंत पाटील यांना इशारा दिला आहे. भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजय पाटील आहे, असा दावा संजयकाका पाटील यांनी केला आहे. “जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहास काढायला भाग पडू नये”, असा इशारा संजयकाका पाटील यांनी दिला. आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान देखील संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना दिले आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजयकाका पाटलांच्यावर टीका करताना, संजयकाका पाटील यांना आपणच भाजपसोबत पाठवलं होतं, असं विधान केले होतं. यावरून संजयकाका पाटलांनी जयंत पाटलांना हा इशारा दिला आहे.
संजय काका पाटील काय म्हणाले?
“सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं. संजय काकांना भाजपच्या बैठकीला आम्ही पाठवलं होतं आणि ते आम्हाला माहिती देत होते, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. पण जयंत पाटील यांना माझं सांगणं आहे की, मी तुम्हाला आयुष्यात कधी माझा नेता मानला नाही आणि मानायची वेळही येणार नाही. पण तुम्ही पोरकटपणाने जे वक्तव्य केलं आहे, जिल्ह्यामधील माणसं राजकारण जवळून पाहतात. तुम्ही कितीवेळा भाजपमध्ये येण्यासाठी उंबरे झिझवले त्याचा संजय पाटील देखील साक्षीदार आहे”, असं संजयकाका पाटील म्हणाले.
‘मला क्रमश: काही गोष्टी काढाव्या लागतील’
“तुम्ही कुणाकुणाशी बोलता, कसं अंडस्टॅडिंगचे राजकारण खेळता, आपल्या तालुक्यातच तुमचं कसं राजकारण आहे, एकाच गावातले दोन गट एकमेकांच्या विरोधात लढवायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची या सगळ्या बाबी आणि आपला इतिहास मला काढायला लावू नका. तुम्ही तुमच्या इथून दोन माणसं, संजय पाटील चार माणसं बरोबर घेऊन आला, त्याचा राग म्हणून तुम्ही माझ्याशी भांडायला पाहिजे होतं. पण तुम्ही काहीतरी कुचके राजकारण करण्याची भूमिका दाखवली आहे. यापुढे हे थांबलं नाही तर मला क्रमश: काही गोष्टी काढाव्या लागतील. एवढाच माझा तुम्हाला इशारा आहे”, असा मोठा इशारा संजयकाका पाटील यांनी दिला.
“आमची अडचण करावी हाच त्यांचा हेतू होता. माझ्यासारखा माणूस एकाकी पडला होता. मी लढलो. मला साथ दिली. नगरपालिका, नगरपंचायत आली, बहुमत आणले. लोकांनी मला दिलेली शक्ती आहे. त्यामुळे मला असं दिवसा वेगळं आणि रात्री वेगळं, अंडरस्टँडिगचे राजकारण करावं, हे मी कधी केलं नाही. तुम्ही माझ्यावर आक्षेप घेताय. माझ्या राजकारणावर अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. लोक शहाणे असतात. लोक ओळखतात. पण तुम्हाला मी या निमित्ताने इशारा देतोय”, असाही इशारा संजयकाका पाटील यांनी दिला.
‘जयंत पाटलांचं वक्तव्य चुकीचं’
“मी मागणी केली होती की, आम्हाला आमच्या अजित दादा गटाला अध्यक्ष पद द्या. अजित दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला अध्यक्षपद दिलं तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. पण आदल्यादिवशी ही प्रक्रिया झाली. तिथून आम्ही उठून आलो. यानंतर मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिणींचा फोन आला. असं करु नका, आपल्याला महायुती म्हणून निर्णय घ्यायचा आहे, असं आवाहन त्यांनी केलं. अडचणीच्या काळात जो माणूस मदतीला येतो तो खरा मित्र असतो. त्यामुळे मी निर्णय घेतला. मला माहिती आहे. माझ्यासोबत दोन जण आले. बाकीचे आता आले नाहीत. त्यांचं काय बोलणं झालं, तो विषय मला घ्यायचा नाही. मला कुणाचे नुकसान करायचं नाही. पण ज्या पद्धतीने जयंत पाटलांनी वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं आहे”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
“इथे वर्चस्व संपवण्याचा शंभर टक्के प्रयत्न आहे. पुढचं आज बोलत नाही. जयंत पाटलांनी मुलगा प्रतीक पाटील यांच्या डोक्यावर हात ठेवावा आणि संजय पाटलांनी आपल्याला मदत केली हे सांगावं. खोटं बोलून कुचकं राजकारण करत आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा