Headlines

buldhana district 211 villages crops on 3802 hectares were destroyed by unseasonal rain; अवकाळीने रब्बी मातीमोल! बुलढाण्यातील 201 गावांना फटका; 3802 हेक्टरवरील पिकांची मोठी हानी


म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा/अमरावती: विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील उत्पन्नाचे स्वप्न मातीमोल झाले आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील २०१ गावांतील ३ हजार ८०२ हेक्टरवरील पिके या पावसाने उद्‌ध्वस्त झाली आहेत. तसा प्राथमिक अंदाजाचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

गहू, हभरा, कांदा, कांदा बीज, मका, ज्वारी, भाजीपाला, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, आंबा, बाजरी पिके आडवी झाली. तालुकानिहाय विचार करता चिखलीतील १८ गावे, बुलढाणा १४, मोताळा १६, मलकापूर ४२, खामगाव २०, शेगाव दोन, नांदुरा १५, जळगाव-जामोद ४१, संग्रामपूर ११, लोणार १०, देऊळगाव राजा तालुक्यातील १२ गावांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे.

Maharashtra TimesRain Alert: मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पंचनामे करण्याची मागणी
दरम्यान, मोताळा तालुक्यातील तळणी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा तीन एकरातील हरभरा जळून खाक झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. तळणी येथील श्रीनिवास पद्माकर नाफडे यांनी हरभरा पेरला होता. तीन एकरातील हरभरा सोंगून त्याची गंजी घालण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास वादळी पावसात वीज कोसळल्याने हरभऱ्याची गंजी जळाली. यात सुमारे दोन लाखांवर नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मेळघाटसह अंजनगाव सुर्जी आणि अचलपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अमरावती शहर, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली तालुक्यातही मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मेळघाटातील काटकुंभ, कोयलारी, बामादेही, राजनिकुंड आणि चुरणी परिसरात गुरुवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस झाला. या पावसासोबत झालेल्या गारपिटीने उभ्या गव्हाच्या पिकाचा अक्षरश: चिखल केला. यंदा पीक चांगले येईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या पावसाने हिरावला आहे. यानिमित्ताने मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Maharashtra TimesSatara ZP : पोलीस आणि मंत्र्यांची पहिल्यांदाच झटापट, सातारा ZP अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत टोकाचं राजकारण
पांढरा कांदा संकटात

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा भागात १९ मार्च रोजी दुपारी गारपिटीने तडाखा दिला. तालुक्याचा पांढरा कांदा देशभरात प्रसिद्ध आहे, मात्र काढणीला आलेला हा कांदा आता पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच व्यापाऱ्यांनी पावसाचे निमित्त साधून दरात मोठी कपात केली आहे. दीड हजार रुपये क्विंटल असलेला कांदा आता साडेआठशे रुपयांवर आला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत