Headlines

Palus Educational Institution Director Sanjay Paranjpe Death Case Update Police Detained Minor Boy


सांगलीच्या पलूस येथे एका शिक्षण संस्थेच्या संचालकांचा चार दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं आहे.

Palus News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावत, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. किरकोळ वादातून त्याने संजय प्रभाकर परांजपे यांची हत्या केल्याचा आता उघडकीस आले आहे. 18 मार्च रोजी संजय परांजपे यांची पलूसमध्ये धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केल्याचा प्रकार घडला होता. परांजपे राहत असलेल्या घराच्या पार्किंगमध्ये एका अल्पवयीन मुलाशी किरकोळ वाद झाला ज्यातून मुलाने परांजपे यांना ढकलून दिल्यानंतर खाली पडल्याने परांजपेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ही बाब परांजपे सांगतील या भीतीपोटी, मुलाने टोकदार शस्त्रांनी,परांजपे यांच्यावर हल्ला करून खून करत पळ काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पलूस येथील खाजगी सावकार आणि शिक्षण संस्था संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६१ रा. परांजपे वाडा, पलूस) यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी कोणताही पुरावा हाती नसताना तांत्रिक माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. परांजपे यांच्याशी तात्कालिक कारणातून झालेल्या वादात धारदार हत्याराने त्यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

पलूस शहरात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घुसून त्यांची निर्घृण हत्या केली होती. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषणला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार एक पथक तयार करण्यात आले. घटनास्थळावर कोणताही तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता.

खुनानंतर दोन दिवस पोलिसांनी मृत परांजपे यांचे सावकारीचा व्यवसाय, शिक्षण संस्था आणि इतर संबंध या अनुषंगाने तपास केला. मात्र, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. यावेळी पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीवर जोर दिला. यावेळी सदरचा गुन्हा हा एका अल्पवयीन मुलाने केला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की, मृत परांजपे यांच्याशी बुधवारी गणेश सदन अपार्टमेंटमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. यावेळी त्याने संजय परांजपे यांना जोरात धक्का दिल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. यावेळी परांजपे उठून सदर घटनेबाबत इतर कोणाला तरी सांगतील या भीतीने हत्याराने तोंडावर, गळ्यावर, डोक्यात आणि मानेवर वार करून त्यांचा मोबाईल घेऊन गेल्याचे सांगितले. यावेळी त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेत पोलिसांनी मोबाईल जप्त केला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा