Headlines

Manoj Jarange Patil Final Decided Hunger Strike on May 30 After Meet Radhakrishna Vikhe Patil


मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवली सराटी गावात गेलं. शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रचंड प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आलं नाही. आपण उद्या भर उन्हात कठोर उपोषणाला बसणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं.

Manoj Jagange Patil
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून उपोषणाला बसण्यावर ठाम आहेत. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावेत. तसेच सरकारच्या तपासात सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदींना मान्यता देवून तातडीने जात प्रमाणपत्र द्यावे. तसेच जात प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र देखील द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज अंतरवली सराटीत जावून मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. मनोज जरांगे यांनी उद्या भर उन्हात उपोषणाला बसणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पाणीदेखील घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

“आज रात्रभर विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी चर्चा करावी. उद्या आंदोलन सुरु झालं म्हणजे काही बॉम्ब टाकणे सुरु झालं नाही. उद्याच्या दिवस येतील ते. आंदोलन उन्हात होणार आणि कठोर आमरण उपोषणच होणार. ते आले, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या तर तो नंतरचा भाग राहीला. आता माघार नाही”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.

‘हैदराबाद गॅझेटनूसार ६१ हजार जात प्रमाणपत्राचे वाटप’

दरम्यान, “कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागील सात आठा महिन्यात मराठवाड्यात ६१ हजार २३० कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत”, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अंतरवाली सराटी येथे जाण्याआधी विखे पाटील यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार प्रसाद लाड हे देखील उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, “न्या. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. मागील तीन वर्षात मराठवाड्यात ३ लाख २ हजार कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली. त्यात मागील सहा महिन्यांचा म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतरची आकडेवारी पाहिली तर ६१ हजार प्रमाणपत्र दिली गेली आहेत. याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेतला.”

“काही ठिकाणी जात प्रमाणपत्र देण्यात अधिकारी दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. प्रमाणपत्र वाटपासाठी आपण त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समित्या अधिक सक्रिय करण्याचे तसेच या समितीच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करुन प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. गावोगावी दवंड्या देणे, ग्रामसभांमधून आवाहन करणे आदी पद्धतीने हे काम केले जाईल. आगामी काळात याबाबत एक विशेष मोहिम राबविली जाणार आहे”, असेही विखे यांनी सांगितले.

दरम्यान, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ४९ हजार ७८ एवढ्या कुणबी नोंदी सापडल्या होत्या. तर कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज करण्यात आलेल्या तीन लाख ८९८ अर्ज पैकी केवळ ४२७ अर्ज नाकारण्यात आलेले आहेत. ३ लाख २५१ कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत तर फक्त २२० अर्जावर निर्णय घेणे बाकी असल्याचा दावा प्रशासनाने या बैठकीत केला आहे.

एसडीएमवर कारवाईचे निर्देश

कन्नड येथील प्रांत अधिकाऱ्याने एका जात प्रमाणपत्राबाबत दिरंगाई केल्याचे समोर आले. मागील वर्षभरापासून तिथे अर्जावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या प्रांत अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. काही अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आक्रोश निर्माण होतो आहे, त्याचाही आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावे, असे विभागीय आयुक्तांना सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तालुकानिहाय जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा, असे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा