Nalasopara Man killed by neighbour over objectionable comment on Wife WhatsApp Status Crime New; बायकोच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अश्लाघ्य कमेंट, जाब विचारणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्याने संपवलं, लग्नाच्या वाढदिवशीतच अंत
Nalasopara Man killed by neighbour over objectionable comment on Wife WhatsApp Status Crime New; बायकोच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अश्लाघ्य कमेंट, जाब विचारणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्याने संपवलं, लग्नाच्या वाढदिवशीतच अंत
Nalasopara Man killed by Neighbour : संतप्त झालेल्या दाम्पत्याने पहाटे आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला असताना हा प्रकार घडला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे पेटलेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या नालासोपारा परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. पत्नीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर केलेल्या आक्षेपार्ह कमेंटचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
पालघर जिल्ह्यात मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत नालासोपारा पश्चिमेतील हनुमान नगर परिसरात शुक्रवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आफताब शेख (२४) असे मयत तरुणाचे नाव असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
आफताब शेख हा पत्नी शबाना (२२) हिच्यासोबत नालासोपारा पूर्व येथील प्रगती नगर भागात राहत होता. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे शबानाने आनंद व्यक्त करत व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले होते.
हनुमान नगर येथे झालेल्या या भेटीत सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. मात्र काही क्षणांतच वाद चिघळला आणि मेहंदीने चाकू काढून आफताबवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या आफताबचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लग्नाच्या वाढदिवशीच पतीचा मृत्यू झाल्याने शबानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Parth Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर घातपाताचा संशय, पण पार्थ पवार बोलत का नाही ?
पूर्वीचे शेजारी
घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. प्राथमिक तपासात आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. आरोपी आणि मयत हे पूर्वी एकमेकांच्या शेजारी राहत असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. Bolivia Plane Crash : बोलिव्हियात वायुसेनेचं विमान कोसळलं, 15 जणांचा मृत्यू, अपघातानंतर रस्त्यावर विखुरलेल्या नोटा उचलण्यासाठी गर्दी धक्कादायक म्हणजे नालासोपारा-वसई परिसरात गेल्या पंधरा दिवसांत घडलेली ही हत्येची पाचवी घटना आहे. विविध कारणांवरुन वाढणारे वाद थेट जीवघेण्या हिंसेपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा