three drown in nagzhari river in ratnagiri; सुट्टीत गावी आले, नदीत उतरले अन् अनर्थ घडला; मुंबईतील काका-पुतण्या व 15 वर्षीय लावण्याचा दुर्दैवी अंत, कोकण हळहळलं
three drown in nagzhari river in ratnagiri; सुट्टीत गावी आले, नदीत उतरले अन् अनर्थ घडला; मुंबईतील काका-पुतण्या व 15 वर्षीय लावण्याचा दुर्दैवी अंत, कोकण हळहळलं
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नागझरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांसह तिघांचा बुडून मृत्यू झाला. मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या नेव्ही कर्मचाऱ्यासह तिघांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी: नदीत अथवा कोणत्याही ठिकाणी पोहताना मोठी काळजी घ्यावी लागते अन्यथा जीवावरती बेतू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात खेड तालुक्यात घडली आहे. खेड तालुक्यात धामणणंद येथे पोहोण्यासाठी गेलेल्या तिघांचा दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुलांचा समावेश आहे तर एका 38 वर्षीय इसमाचा समावेश आहे. यातील दोन जण मुंबई येथून तर पंधरा वर्षीय मुलगी गिमवी गुहागर येथून मे महिन्याच्या सुट्टीत गावी आले होते. खेड तालुक्यातील धामणंद गावात असलेल्या नागझरी नदीत ही मंडळी पोहण्यासाठी गेली होती. याच वेळी या तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांचा परिचय
या दुर्दैवी घटनेत लावण्या विजय पारखे (वय १५), रा.साखर, चौकीची वाडी,ता.खेड जि.रत्नागिरी, नितीन सूर्यकांत जाधव (वय ३८) आणि विराज किशोर जाधव(वय १२, दोघेही रा. गुहागर) या तिघांचाही मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारासही मोठी दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळतात आणि ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केलं, मात्र या तिघांनाही वाचवण्यात यश आलं नाही. येथील नितीन जाधव हे नेव्हीमध्ये मुंबई कामाला होते. तर त्यांच्या भावाचा मुलगा असलेला विराज जाधव हा मुंबई येथील शाळेत शिकत होता. हे दोघेही सुट्टीसाठी गावी आले होते.
दरम्यान, अरुण गोपाळ पार्टे यांची नात लावण्या विजय पार्टे ही देखील त्यांच्यासोबत पोहायला गेली होती. काजूफाटा येथील नागझरी नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले आणि तिघांसोबत घात झाला. या सर्व प्रकारामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, खेड पोलीस ठाण्यात या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेने धामणंद परिसर व खेड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. जाधव व पार्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीसांमार्फत सुरु आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा