SBI Mutual Fund IPO GMP: एसबीआय म्युच्युअल फंडाच्या आयपीओपूर्वीच अनलिस्टेड बाजारातील शेअर्सनी धुमाकूळ घातला आणि गुंतवणूकदारांना अंदाजे 3.8 पट परतावा दिला आहे. 3 वर्षांत या स्टॉकची किंमत 900 रुपयांवरून 2,800 रुपयांपर्यंत वाढली असून कंपनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात अंदाजे 10,000 कोटींचा आयपीओ लाँच करू शकते, ज्यासाठी सेबीचा हिरवा कंदील मिळाला आहे.

ग्रे मार्केटमध्ये SBI MF शेअर्सचा नुसता राडा
या काळात शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झालीच पण, 3:1 रेशोच्या बोनस इश्यूमुळे आणखी फायदा झाला. सुमारे 3 वर्षांपूर्वी SBI म्युच्युअल फंडाचे अनलिस्टेड शेअर्स सुमारे 900 रुपयांवर ट्रेड करत होते, सातत्याने शेअर्सची किंमत वाढून 2800 रुपयांपर्यंत पोहोचली. यादरम्यान, कंपनीने 3:1 रेशोचा बोनस इश्यू देखील जाहीर केला.
Trump Tariff Warning: किती खोटं बोलणार ट्रम्प? व्यापार करार निरर्थक, 100% टॅरिफ लादणार! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
गुंतवणूकदारांना 3.8 पट परतावा
3:1 या प्रमाणात बोनस इश्यू दिल्यानंतर शेअरची किंमत सध्या सुमारे 858 रुपयांवर असून अनलिस्टेडझोनच्या माहितीनुसार शेअरच्या किमतीतील वाढ आणि बोनस शेअरचा लाभ मिळून सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत अंदाजे 3.8 पटीने परतावा मिळाला आहे. अशाप्रकारे, कंपनीच्या शेअर बाजारातील लिस्टिंगपूर्वीच चांगला परतावा मिळाला असून SBI म्युच्युअल फंडाचा बहुप्रतिक्षित IPO जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे.
आपल्या प्रस्तावित IPO द्वारे अंदाजे 10000 कोटी रुपये उभारण्याचा SBI म्युच्युअल फंडचा उद्देश आहे. SBI म्युच्युअल फंडची मूळ कंपनी, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि संयुक्त उपक्रम भागीदार, अमुंडी, ऑफर फॉर सेलद्वारे आपला काही हिस्सा विकू शकतात व भारतातील मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी असू शकतो.
Delayed Possession: घराचा ताबा दिला म्हणजे ग्राहकांचे अधिकार संपले का? बिल्डर लॉबीला सुप्रीम कोर्टाने सुनावलं! नक्की काय घडलं
अनलिस्टेड बाजारातील तेजीमागचे कारण काय
कंपनीच्या अनलिस्टेड शेअर्समधील मोठी वाढगुंतवणूकदारांना SBI म्युच्युअल फंडाच्या व्यवसायावर आणि भविष्यातील वाढीवर मोठा विश्वास दर्शवते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कंपनीचा मजबूत बाजारहिस्सा, चांगला नफा आणि दीर्घकालीन वाढीच्या शक्यतांमुळे कंपनीला फायदा होत राहील, असा गुंतवणूकदारांचा विश्वास आहे.
Bank Holidays July 2026: जुलैमध्ये 12 दिवस बँकांचे कामकाज बंद पडणार; सुट्ट्यांची यादीच पाहूनच कामाचे प्लॅनिंग करा
या अपेक्षेमुळे अनलेटेड बाजारात शेअरची किंमत वाढली, पण अनलिस्टेड बाजारात स्टॉकमध्ये आधीच लक्षणीय वाढ झाल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी, कंपनीबद्दल गुंतवणूकदारांना सकारात्मक अपेक्षा असून IPO नंतर गुंतवणूकदार स्टॉकच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असतील.
(Disclaimer: वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे. कोणताही स्टॉक खरेदी करण्याची किंवा विकण्याची शिफारस समजू नका. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते त्यामुले, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. ग्रे मार्केट सेबी किंवा इतर कोणत्याही नियामक संस्थेद्वारे नियंत्रित नसतात, म्हणून अनलिस्टेड शेअर्समध्ये गुंतवणूक जास्त जोखीम असू शकते.)

