Headlines

सत्तापालटाची भीती, 6 सैन्य कमांडर्सची हकालपट्टी


चीनमध्ये क्षी जिनपिंग यांचा ‘भ्रष्टाचारविरोधी’ हंटर : नोटीसमध्ये कारण नाही नमूद

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनच्या सरकारने एकाचवेळी वरिष्ठ सैन्याधिकारी आणि नेत्यांना त्यांच्या पदांवरून हटविले आहे. या यादीत माजी वित्तीय नियामक प्रमुख ली युंझे आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य मा शिंगरुई यांचे नावही सामील आहे. या सर्वांना अखेर कोणत्या कारणावरून हटविण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

देशातील सर्वोच्च विधायक संस्था नॅशनल पीपल्स काँग्रेसने 6 सैन्य खासदारांसोबत दोन मोठ्या नेत्यांची पदे संपुष्टात आणली आहेत. नॅशनल पीपल्स काँग्रेस चीनमधील कायदा निर्माण करणारी सर्वोच्च संस्था असल्याने यात होणारे बदल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. हटविण्यात आलेलया नेत्यांमध्ये माजी वित्तीय नियामक ली युंझे आणि पॉलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई यांचे नाव सामील आहे.

यासंबंधीची माहिती नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीकडून जारी एका नोटीसमध्ये देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये कुणालाही पदावरून का हटविण्यात आले याचे कारण सामील नाही. याचबरोबर चीनच्या संरक्षण मंत्रालयाला याबाबत विचारणा झाली असता त्यानेही कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

ही कारवाई अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी अभियानाचा हिस्सा असल्याचे समजते. हे अभियान मागील अनेक वर्षांपासून चालविले जात असून यात अनेक मोठ्या अधिकारी आणि टॉप जनरल्सची चौकशी झाली, त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. तर नवी कारवाई याप्रकरणातील सर्वात कठोर मानण्यात येत आहे.

ज्या सैन्य खासदारांना पदावरुन हटविण्यात आले, त्यात जनरल शू श्युछियांग यांचे नाव सर्वात महत्त्वाचे आहे. श्युछियांग हे सेंट्रल मिलिट्री कमिशनच्या इक्विपमेंट डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख होते. हा विभाग चीनचे सैन्य म्हणजेच पीएलएसाठी शस्त्रास्त्रs, उपकरणे निर्मिती, खरेदी आणि त्यांच्या परीक्षणाचे काम सांभाळतो. याचबरोबर शू श्युछियांग हे 2022 पासून चीनच्या मानवयुक्त अंतराळ कार्यक्रमाचे कमांडर-इन-चीफ हेते, म्हणजेच त्यांचे पद अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे मानले जात होते.

जनरल ली फेंगिबयाओ यांनाही हटविण्यात आले आहे, ते पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडमध्ये पॉलिटिकल कमिशनरच्या पदावर होते. जनरल गुओ पुक्षियाओ देखील हटविण्यात आले असून ती पीएलए वायुदलात पॉलिटिकल कमिशनर हणून कार्यरत होते. ईस्टर्न थिएटर कमांडमधून वांग कांगपिंग, सायबरस्पेस फोर्समधून झांग मिंगहुआ आणि सैन्यातून यिन होंगशिंग यांनाही त्यांच्या पदावरून हटविण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण 6 सैन्य खासदारांची पदं संपुष्टात आणली गेली आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत