Headlines

मराठा समाजाचा उद्रेक झेपणार नाही, मनोज जरांगे समर्थक फडणवीसांवर संतापले – manoj jarange supporters protest on samruddhi expressway, warn cm devendra fadnavis



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत.अंतरवाली सराटी येथे शेतात बाज टाकून जरांगेंनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांनी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.मराठा आरक्षणाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला.या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही लेनवरील वाहतूक सुमारे 15 मिनिटांसाठी बंद राहिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत