Western Railways: पश्चिम रेल्वेच्या विरार, चर्चगेट, वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवासी संख्या वाढली आहे. पण लोकल फेऱ्या अपुऱ्या पडत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
म. टा. वृत्तसेवा, पालघर: पश्चिम रेल्वेच्या डहाणू विभागात डहाणू लोकल सेवा सुरू होऊन १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ती सातत्याने वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये पालघर, केळवे रोड, सफाळे व वैतरणा येथील प्रवाशांना गाडीत चढणेही कठीण होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींकडून रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड आणि रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली असून, त्यांच्यासोबत चर्चाही झाल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबत केवळ सकारात्मक आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय अद्याप झालेला दिसत नाही, अशी प्रवाशांची भावना आहे.
दरम्यान, या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवाशांच्या अडचणींबाबत निवेदने देणे; तसेच संसद आणि विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. प्रवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रवाशांशी संवाद साधावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रवाशांची नव्या वेळापत्रकात वाढीची अपेक्षा
सध्याच्या परिस्थितीत डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी मागणी पुढे येत आहे. १ एप्रिलपासून उपनगरी लोकलचे नवे वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकात डहाणू लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, तसेच १५ डब्यांची लोकल सुरू करावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
‘डहाणू-चर्चगेट, डहाणू-दादर, डहाणू-अंधेरी, डहाणू-विरार आणि डहाणू-बोरिवली या मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच १५ डब्यांची लोकल सुरू झाल्यास प्रवाशांना चढउतार करणे सुलभ होईल, प्रवासातील त्रास कमी होईल आणि रेल्वेवरील ताणही काही प्रमाणात कमी होईल. मात्र या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे,’ असे डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेचे सचिव दयानंद पाटील यांचे म्हणणे आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा